Saturday, May 8, 2021

पीक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट पावत्या द्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार आरोपीस नगर तालुका पोलिसांनी अटक केली.

 पीक विमा मिळवून देतो असे सांगून बनावट पावत्या द्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करून दोन वर्षांपासून फरार आरोपीस नगर तालुका पोलिसांनी अटक केली.

 सदर गुन्हा 13/3/2019 रोजी  नगर तालुका पो ठाणे गुन्हा र न 131/2019  भादवी कलम 406,468 प्रमाणे दाखल होता तेव्हापासून आरोपी नामे दीपक शिवाजी गायकवाड वय 27 रा निमगाव वाघा हा फरार होता ..

सदर आरोपी हा त्यावेळी महा इ सेवा केंद्र चालवत असे त्याचा फायदा घेऊन पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन फसवणूक केली होती , व फरार झाला होता ,सदर आरोपी लॉक डाउन मध्ये  आल्याची माहिती मिळताच ,

सपोनि राजेंद्र सानप,psi धनराज जारवाल, पोना शिंदे ,पोना मरकड,पोना खेडकर यांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे,

न्यायालयाने आरोपीस दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून किती शेतकऱ्यांची फसवणूक केली त्याचा तपास सुरू आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only