Wednesday, May 26, 2021

सावेडी उपनगर भागातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये गुलमोहर रोड व सिंधी हॉल येथे लसीकरण केंद्र सुरू करा- मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर यांची मागणी मनपा आरोग्य अधिकारी बोरगे यांना निवेदन

 सावेडी उपनगर भागातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये गुलमोहर रोड व सिंधी हॉल येथे लसीकरण केंद्र सुरू करा- मा.नगरसेवक अजिंक्य बोरकर यांची मागणी


मनपा आरोग्य अधिकारी बोरगे यांना निवेदनअहमदनगर प्रतिनिधी- नगर शहरातील सावेडी उपनगर भागामध्ये टीव्ही सेंटर जवळ जिजामाता आरोग्य केंद्र हे फक्त एकच लसीकरण केंद्र असल्याने याठिकाणी सावेडी उपनगर भागातील नागरिकांची मोठी गर्दी निर्माण होती. प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांना या गर्दीमुळे लसीकरणापासून वंचित राहावे लागत आहे, सदर केंद्रावर गर्दी होत असल्याने कोरोनाविषाणूचा प्रादुर्भाव पसरण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मध्ये तारकपूर येथे गुलमोहर रोड तसेच सिंधी हॉल याठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन प्रभाग क्रमांक चार मधील रहिवाशांचा समवेत मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. बोरगे यांना देण्यात आले यावेळी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर, रवींद्र नारंग, जयकुमार रंगलानी,सनी आहूजा, सावन छाबरा,शेरी ओबेरॉय,राकेश नवलानी,पूनित दुग्गल, बळू नवलानि, जस्विन अहुजा, कैलास नवलानि, हर्षल बांगर, गिरीश नवलानी तसेच आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. दिलेल्या निवेदनात म्हटले की प्रभाग क्रमांक चार हा विस्ताराने मोठा प्रभाग आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक वास्तव्यास आहेत लोकसंख्या नुसार या प्रभागांमध्ये दोन लसीकरण केंद्र आवश्यकच आहे. सावेडी उपनगर भागामध्ये जिजामाता लसीकरण केंद्र असल्याने या ठिकाणी नागरिक लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक चार मधील नागरिक लसीकरणापासून वंचित राहत आहे. तरी लवकरात लवकर प्रभाग क्रमांक चार मध्ये सिद्धी हॉल व गुलमोहर रोड या दोन्ही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या असे दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only