Sunday, May 30, 2021

आरोग्य अधिकाऱ्याला भोवला वाढदिवस

मनपातील दिवानासह सहकार्‍यांना कारणे दाखवा

अहमदनगर/प्रतिनिधी- स्वतःच्या


कार्यालयात एक हसीना थी...एकदिवाना था... गाणे सुरेल आवाजात गाणारे मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावलीआहे. एवढेच नव्हे तर डॉ. बोरगेंच्या गाण्याला टाळ्यांची दाद देणार्‍यात्यांच्या कार्यालयीन सहकार्‍यांनाही या नोटिसीचा दणका बसला आहे. अर्थात, यासर्वांना ही नोटीस गाणे म्हटले वा दाद दिली म्हणून नाही तर कोविड नियमधाब्यावर बसवले म्हणून दिली गेली असून 24 तासात खुलासा करण्याचे बजावण्यात आले आहे.
27 मे रोजी डॉ. बोरगे यांचा वाढदिवस झाला वयानिमित्ताने त्यांच्या कार्यालयीन सहकार्‍यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले तसेचयावेळी डॉ. बोरगे यांनी कर्ज चित्रपटातील एक हसीना थी...गाणेहीकराओके म्युझिक सिस्टीमवर सुरेल आवाजात सादर केल्याचे वृत्त सोशलमिडियातून व्हायरल झाले होते. त्यांचे हे गायन तसेच वाढदिवसानिमित्तचाशुभेच्छांचा वर्षावाचे फोटो सोशल मिडियातून आल्यावर येथील सामाजिककार्यकर्ते शाकीर शेख यांनी आक्षेप घेताना, डॉ. बोरगे आणि त्यांचे कनिष्ठवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सोशल डिस्टन्स तसेच मास्क न वापरतावाढदिवस पार्टी कशा पद्धतीने सादर केली आहे व सर्वसामान्य नागरिकांनी असाप्रकार केला असता तर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली असती, असे स्पष्ट करून,आयुक्त साहेब या लोकांविरोधात आपण कारवाई करणार का? असा सवाल विचारलाहोता. याशिवाय सोशल मिडियातूनही गायन व फोटो व्हायरल झाल्यावर त्यावरटीकाटिपण्णी झाली होती. या पार्श्‍वभूमीवर आयुक्त गोरे यांनी डॉ.बोरगे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.


...तर, शिस्तभंगाची कारवाई


आयुक्त गोरे यांनी डॉ. बोरगे यांना कारणे दाखवानोटिस दिली असून, त्यात म्हटले आहे की, कोरोना विषाणू(कोव्हीड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना सुरु आहेत.तथापी, दि. 28 मे रोजी समाज माध्यमामध्ये आपण दि. 27 मे रोजी आपल्या कार्यालयातकनिष्ठ अधिकारी-कर्मचारी यांच्या समवेत मास्क न वापरता व सोशल डिस्टसिंगचेपालन न करता गर्दी जमवून वाढदिवस साजरा केल्याबाबतची व आपण कार्यालयात गाणेगात असल्याबाबतची बातमी व्हायरल झालेली आहे. यावरुन आपणास सदरबाबत गांभीर्य नसल्याचेदिसून येत असून शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन केलेले आहे व आपले सदरचे वर्तनहे कार्यालयीन शिस्तीस सोडून अत्यंत गैर, बेजबाबदारपणाचे, कामकाजामध्ये अक्षम्य असेदुर्लक्ष करणारे, वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता करणारे, अत्यावश्यक सेवेमध्येअडथळा निर्माण करणारे व महापालिकेची जनमानसात प्रतिमा मलिन करणारे आहे. यास्तवसदरकामी आपणास वैयक्तीकरित्या जबाबदार धरुन तुमच्याविरुध्द साथरोग अधिनियम 1897 वआपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या तसेच महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 56नुसार कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा 24 तासाच्या आत सादर करावा.मुदतीत खुलासा सादर न केल्यास उक्त तरतुदीनुसार शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्तावीतकरण्यात येईल, असे या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अशीचनोटिस या वाढदिवस कार्यक्रमास उपस्थित असणारे डॉ. बोरगे यांच्या मिश्रकसतीश मथुकर मिसाळ, भाऊसाहेब बबनराव सुडके, विकास भानुदास गिते, महंमदजावेद गुलमोहंमद रंगरेज व किरण बलभीम खरात आणि लिपीक टंकलेखक धोंडीबादेवजी भाकरे, या सहा कार्यालयीन सहकार्‍यांनाही देण्यात आली आहे.
--चौकट
ती तक्रार हेतुपुरस्सर-डॉ. बोरगे
शासन दप्तरात माझी जन्मतारीख 1 जून आहे. त्यामुळे 27 मे रोजीमी वाढदिवस साजरा केल्याची तक्रार खोटी व हेतुपुरस्सर आहे. त्याबाबतच्यानोटिसीचा योग्य खुलासा मी करणार आहे, असे डॉ. बोरगे यांनी सांगितले. तेपुढे म्हणाले, त्यादिवशीचा कार्यक्रम हा पब्लिक फंक्शन नव्हता. काही अडचणी, तक्रारीव कामे घेऊन कार्यालयीन सहकारी माझ्या कार्यालयात आले होते. यानिमित्तानेत्यांना चहापाणी केले तसेच कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठीत्यांचे मनोधैर्य वाढवण्याच्यादृष्टीने गायन व गप्पाटप्पा झाल्या. गायन हा माझाछंद आहे व सहकार्‍यांनी आग्रह केल्याने मी गायन केले. तसेच तेथे उपस्थित सर्वांचेव्हॅक्सिनेशनही झालेले आहे, सर्व कोरोनायोद्धे आहेत आणि मागील दीड वर्षांपासूनआम्ही कोविड नियम पाळत आहोत व त्याची जनजागृतीही करीत आहोत. त्यामुळेत्यादिवशी तेथेही ते नियम आम्ही पाळले, असेही डॉ. बोरगे यांनी स्पष्ट केले.


--


फोटो ओळी
मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगेयांच्या कार्यालयात 27 मे रोजी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित कर्मचार्‍यांनीत्यांच्यासमवेत सेल्फी घेतला.


--


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only