Friday, May 21, 2021

अहमदनगर येथील कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई तपास Dysp संदीप मिटके यांच्याकडे वर्ग

 *अहमदनगर येथील कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई*

*तपास Dysp संदीप मिटके यांच्याकडे वर्ग*

 अहमदनगर जिल्हात मालमत्ता विषयक   गुन्ह्याकरिता कुप्रसिद्ध    असलेल्या नयन तांदळे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. सुपा पोलीस स्टेशन येथे फिर्यादी अक्षय चखाले रा. निगडी , पुणे यांनी Cr. No. 504/ 2020 IPC 395, 341 नुसार गुन्हा दाखल केला होता, सदर गुन्हा कुप्रसिद्ध नयन तांदळे टोळीने केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर नयन तांदळे सह टोळीतील अन्य 4 सदस्यांना अटक करण्यात आली होती. नयन तांदळे टोळी ही कोणताही कामधंदा न करता संघटीत पणे बेकायदेशररित्या स्वतःच्या आर्थिक फायद्या करिता हिंसाचाराचा वापर करून , हिंसाचार करण्याची धमकी देऊन तसेच धाक दपटशहा  दाखवून जबरदस्तीने जबरी चोरी, दरोडा टाकून दहशत करीत होती. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन  मनोज पाटील( पोलीस अधिक्षक), मा. श्री. सौरभ अग्रवाल मा. श्री. अजित पाटील यांनी  सदर गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली असून तपास Dysp संदीप मिटके यांच्या कडे वर्ग करण्यात आला आहे. 

सदर टोळीवर या पूर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

1)नयन राजेंद्र तांदळे 

1) सूपा 504/20 IPC 399, 402

 2) सुपा 111/ 17 IPC 379, 34, 411

 3)  तोफखाना 6663/20 IPC 394, 365, 34... 

4) तोफखाना 1756/19 ipc 393, 34.

 5) तोफखाना 1715/19 ipc 392, 34 

 6) तोफखाना 1607/19 ipc 392 , 323, 34                                         7) तोफखाना 1546/19 ipc 394, 323, 34                                8) तोफखाना 1765/19 ipc 392 ,34.   

     2) विठ्ठल साळवे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 402 

2) सुपा 111/17 IPC 379, 34.  3)तोफखाना 6663/20 IPC 394, 365 34

  3) अक्षय ठोंबरे 

1) सुपा ipc 399, 402 

  4) शाहुल पवार 

1) सुपा 505/20 IPC 399, 402. 

2) सुपा 153/ 17 ipc 341, 394,396, 34

 3) 87/ 17 IPC 394,397, 34 4) 23/15 ipc 379, 354, 323.... 

5) अमोल पोटे 

1) सुपा 505/ 20 IPC 399, 34 

2) 86/17 ipc 394, 397, 34

 3) 118/ 15 सुपा ipc 379, 34

*पुढील तपास मा. मनोज पाटील पोलिस अधीक्षक, मा. सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शन खाली Dysp संदीप मिटके हे करीत असून त्यांना PI नितीन गोकावे, PN अमोल धामणे, PN साहेबराव ओव्हाळ, PC यशवंत ठोंबरे यांचे पथक सहाय्य करीत आहे*

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only