Saturday, May 22, 2021

रामवाडी येथील फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुर चौका पर्यत रस्ता डांबरीकरण कामाची आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणी हा रस्ता नगर शहराच्या वैभवात भर पाडेल-आ.संग्राम जगताप

 रामवाडी येथील फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुर चौका पर्यत रस्ता डांबरीकरण कामाची आ.संग्राम जगताप यांनी केली पाहणीहा रस्ता नगर शहराच्या वैभवात भर पाडेल-आ.संग्राम जगतापअहमदनगर प्रतिनिधी- नगर शहराला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळख असलेल्या रस्त्याची डांबरीकरण व मजबुतीकरण तसेच काँक्रीटीकरण कामाची पाहणी शहराच्या आ. संग्राम जगताप व नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या उपस्थितीत पार पडली. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यासाठी अनेक वेळा येथील रहिवाशांनी महापालिका निवेदन देऊन रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली होती. नगरसेवक मुदस्सर शेख यांच्या यांच्या पाठपुराव्यामुळे आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने हत्ती चौक ते रामवाडी पेट्रोल पंपा पर्यंत पावसाळ्यात सर्वात जास्त खराब होणाऱ्या या रस्त्याचे काँक्रिटीकरण ही करण्यात आली आहे. नगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून ये-जा करत करतात त्याबरोबर जिल्हा पोलिस दलाचा पोलीस हेडकॉटर याच रस्त्यावर आहे.या रस्त्यावर मोठी वर्दळ असते पावसाच्या काळामध्ये या रस्त्यावरून नागरिकांना आपली वाहने चालवणे कठीण जाते,नागरिकांना मोठी तारेवरची कसरत करून या रस्त्यावरून जावा लागत होते. आता हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर नगर शहराच्या वैभवात भर पडेल असे प्रतिपादन शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

        रामवाडी येथील फलटण पोलीस चौकी ते सर्जेपुर चौका पर्यत रस्ता डांबरीकरण तसेच काँक्रिटीकरण कामाची पाहणी करताना आ. संग्राम जगताप,नगरसेवक मुदस्सर शेख,वसीम हुंडेकरी,पप्पू पाटील,तन्वीर पठाण,विकास उडानशिवे, पप्पू शेठ ॲबट आदी उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only