Tuesday, May 25, 2021

किरकोळ कारणातून दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली.


अहमदनगर |

किरकोळ कारणातून दोन गटात झालेल्या वादात एका तरुणाची धारदार शस्त्राने पोटात वार करून हत्या करण्यात आली.

शरद दत्तात्रय वाघ (रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी शिवारात ससेवाडी जाणारे रोडवर तलावाच्या जवळ सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये आणखी चौघे तरूण जखमी झाले आहेत.


याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मल्हारी उर्फ रघुनाथ बन्सी आल्हाट, सुभाष बन्सी आल्हाट, बन्सी भिवा आल्हाट, ऋषीकेश रघुनाथ आल्हाट, मारीया बन्सी आल्हाट ( सर्व रा. पिंपळगाव उज्जैनी ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत. बाळासाहेब नामदेव वाघ (वय 50 रा. पिंपळगाव उज्जैनी) यांनी फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक निरीक्षक युवराज आठरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only