Monday, May 17, 2021

विषय केंद्र सरकारने इंधन व खत यांचे किंमतीमध्ये केलेल्या दरवाढीबाबत....राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन

 नगर दि 17 प्रतिनिधी


देशात पेट्रोल व डिझेल इंधनाच्या दरवाढीचा उच्चांक झालेला आहे. इंधन दरवाढीची झळ मध्यमवर्ग, चाकरमानी शेतकरी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्याची झळ पोहोचली आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीशी सामना करत असताना दुसरीकडे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकार वारंवार महागाईमध्ये वाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करण्याचे काम करत आहे.असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे.आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांना या संदर्भातील निवेदन दिलेले आहे


भारतात पेट्रोलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोलचे दर गेलेले असतानाच केंद्र सरकारने आज शेतकरी वर्गाला दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किमती भरमसाठ वाढविण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. १०.२६.२६ ची किंमती ६०० रुपयांनी वाढली आहे. डिएपीची किंमत जवळपास ७१५ रुपयांनी वाढली आहे. जो डिएपी १९८५ रुपयाला होता, तो आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ चे पन्नास किलोंचे पोते ११७५ रुपयांचे होते ते आता १७७५ रुपयांना मिळणार आहे. यासोबत पोटॅशच्याही किमती वाढविल्या आहेत. देशातल्या खतांची किंमत प्रचंड प्रमाणात वाढविण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. कोरोनामुळे देशातील शेतकरी आधीच अडचणीत सापडलेला असताना खतांची दरवाढ करून केंद्र सरकारने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.


पेट्रोल व डिझेल इंधन दरवाढीमुळे महागाई वाढतच चाललेली आहे. याचा रोष विविध माध्यमाव्दारे व्यक्त केला जात असताना देखील केंद्र सरकार यावर कोणतेही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. म्हणूनच केंद्र सरकारच्या इंधन व खत दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर निषेध व निदर्शने करण्यात येत आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


तरी कृपया इंधन व खतांची झालेली दरवाढ तातडीने कमी करून सर्वसामान्यांना दिलासा देण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाभर आंदोलने करण्यात येतील व होणा-या परिणामास केंद्र सरकार जबाबदार राहील.असे निवेदनात म्हटले आहे.यावेळी राजेंद्र फाळके पाटील, जिल्हाध्यक्ष, अंबादास गारुडकर, प्रदेश सरचिटणीस,  गायकवाड, सभापती,अशोकराव बाबर, प्रदेश प्रतिनिधी,  लोटके, उपाध्यक्ष,  सुहास कासार, उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, नगर केशवराव बेरड, सरचिटणीस , प्रा. सिताराम काकडे सर, सरचिटणीस , पटेल, सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, उपस्थिती होती.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only