Tuesday, May 25, 2021

नगर अर्बन बँकेचे, बँकेच्या आणखी चार शाखा होणार बंदनगर अर्बन बँकेचे

बँकेच्या आणखी चार शाखा होणार बंद

बँक वाढविणे पेक्षा बँक लूटता कशी येईल असा दिवस रात्र डोक्यात विचार असणारे व्यक्ति चे हातात बँकेचा कारभार एकतर्फी गेलेवर बँकेची हालत किती खराब होवू शकते व बँकेचे आर्थिक नुकसान किती होवू शकते. शतकोत्तर व वैभवशाली परंपरा कशी धुळीला मिळते याचे दुर्देवी उदाहरण म्हणजे आपली नगर अर्बन बँक. 

2008 मध्ये नगर अर्बन बँकेत सत्तांतर होवून एका मोठ्या राजकीय शक्तीचे हातात बँकेचा कारभार गेला. 

2008 मध्ये सत्तांतर होणेची प्रमुख कारणे होती, गुटखा प्रकरण, दोन वर्षे सभासदांना लाभांश न मिळणे,सभासदांचे न वाटलेल्या लाभांशाची रक्कम नियमबाह्य पध्दतीने नफ्यात दाखविणे, व नगर चे बाजारपेठेत झालेले एक कोट्यावधीचे ( आजची थकबाकी 20 कोटीचे पूढे) कर्जप्रकरण. 

2008 चे निवडणुकीत वरिल मुद्दे सभासदांना आवडले नाही म्हणून सत्तांतर  23 विरूद्ध 2 अशा एकतर्फि फरकाने होवून एक राजकीय व्यक्ति सत्तेवर आली. 

एकतर्फी सत्ता मिळताच या राजकीय व्यक्ति ने बँक कायम आपलेच ताब्यात कशी राहील व आपणास कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन कसे राहील या दृष्टि ने व्यूहरचना करून

डाव टाकायला सुरूवात केली. 

बँकेला भविष्यात घातक ठरणारे हे डावपेच संचालक मंडळातील सत्ताधारी गटातील काही स्वाभिमानी संचालकांचे लक्षात आले व त्यांनी सत्तेला लाथ मारून त्या राजकीय मोठ्या ताकदी शी संघर्ष सुरू केला. 

सर्व प्रलोभने, दमबाजी, दडपण कशालाच भिक न घालता या संचालकांनी बँकेचे होणारे संभाव्य नुकसान थांबविणेचा प्रयत्न सुरू केला. 

परंतु बँकेला लूटनेचे रक्त तोंडाला लागलेली मोठी राजकीय ताकद व पैसाचा जोर यापुढे सर्वसामान्य परंतु स्वाभीमानी संचालकांची ताकद कमी पडायला लागली. 

संचालक मंडळातील बहुमत, व बँकेचे वरिष्ठ अधिकारी ची साथ या जोरावर ती लूटारू राजकीय ताकद सरस ठरत होती. 

बँक लूटने साठी पहिला मोठा डाव टाकणेत आला तो म्हणजे बँकेचे नवीन शाखा उघडणेची चाल. 

यात होणारे फायदे 

1)नवीन शाखेसाठी जागा भाड्याने घेणेत आर्थिक फायदा. 

2) शाखेचे फर्निचर, लाईट काम, रंगरंगोटी, मध्ये हाथ धुवून घेणे

3) एका शाखे करिता 7 कर्मचारी नवीन घेता येतात 

7×........... 

4)नवीन शाखेत 500/600 सभासद वाढवायचे म्हणजे पूढील निवडणुकीची पुर्व तयारी. 

5) शाखांचे उदघाटन कार्यक्रमात राजकीय स्वार्था बरोबर आर्थिक लाभ करून घेणे 

वरिल 5 प्रमुख मतलब

 साध्य करणेवर जास्त भर असायचा, बँकेला व्यवसाय किती मिळेल ,बँकेचा फायदा होईल की नुकसान याचा कुठलाही विचार न करता या नवीन शाखा उघडणेचा धडाका लावला होता. 

 संचालक मंडळातील स्वाभिमानी संचालकांनी याला कडाडून विरोध केला व भविष्यात तोट्यात जाणा-या शाखा उघडू नका अशी विनंती केली सोबतच तत्कालीन सरकार राज्यमंत्री कडून या शाखांचे उभारणीस स्थगिती देखील आणली होती. 

परंतु एक नवीन शाखा म्हणजे लाखोंचा फायदा सोबत पूढील निवडणुकीवर डोळा ठेवून बसलेल्या भ्रष्टाचारी प्रवृतीने ही स्थगिती देखील धुडकावून लावली. 

2008 ते 2012 या कालावधीत तब्बल 15 नवीन शाखा सुरू करण्यात आल्या व यातील दोन चार शाखांचा अपवाद वगळता सर्वच शाखा सुरूवातीपासून तोट्यात आहेत. 

या शाखांचे उदघाटन कार्यक्रमातील भ्रष्टाचाराचे मुद्दे संपूर्ण महाराष्ट्रात गाजले. 

उदा. खासदार शत्रुघ्न सिन्हा चा हवाई प्रवासाचे लाख रूपयेचे पूढील बोगस बिल, जेवणाचा आकडा वाढवून दाखविणे, हर्षवर्धन पाटील यांचे नावावर टाकलेला बोगस खर्च ईत्यादी प्रमुख मुद्दे होते. 

एका शाखेत लाखो रूपयांचा फायदा होतो हे पाहून भ्रष्टाचारी चेअरमन 2013 मध्ये बँक मल्टीस्टेट केली व बँकेच्या 100 नवीन शाखा करून मोठी रक्कम लूटनेचे नियोजन केले होते. 

बँकेतील स्वाभीमानी संचालकांनी रिजर्व बँकेशी पत्रव्यवहार करून सर्व परिस्थिति तपासून नंतरच नवीन शाखांना परवानगी द्यावी अशी विनंती केली. 

रिजर्व बैंकेने सर्व भ्रष्टाचार व नवीन शाखांना होत असलेला तोटा पाहून नवीन शाखांना परवानगी देणे बंद केले व नगर अर्बन बँक मोठ्या लूटमारी पासून वाचली

परंतु आर्थिक लाभासाठी सुरू करणेत आलेल्या 15 नवीन शाखा पैकी काही अपवाद वगळता बहुतांशी शाखा तोट्यात राहील्या व बँकेचे कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले. 

ऑगस्ट 2019 मध्ये भ्रष्टाचारी चेअरमन व संचालक मंडळाची हाकलपट्टी झाली व बँकेवर आलेले प्रशासकांनी तोट्यात असलेल्या शाखा बंद करणेचा निर्णय घेतला 

चाकण व सिन्नर शाखा काही महिनेपुर्वी बंद करण्यात आल्या व आता दि. 21/05/2021 रोजी झालेल्या ठरावा प्रमाणे शिर्डी, कोपरगाव, चंदननगर व दौंड या तोट्यात असलेल्या शाखा बंद करणेचा निर्णय घेण्यात आला आहे. दि 31/08/2021 पर्यत या शाखा बंद करणेत येणार आहेत. बँकेचा सातत्याने वाढत असलेला तोटा कमी करणेचे पार्श्वभूमीवर हा कटू परंतु योग्य निर्णय घेण्यात आला. 

दुर्देव बँकेचे एका अहंकारी व भ्रष

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only