Saturday, May 15, 2021

नगर शहरात पोलिसांची एकाच वेळी नाकेबंदी ; अनेकांची रस्त्यावर कोरोना टेस्ट
 नगर शहरात पोलिसांची एकाच वेळी नाकेबंदी ; अनेकांची रस्त्यावर कोरोना टेस्ट 


नगर -  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहर पोलिसांनी आज एकाच वेळी नाकाबंदी करत नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली.  नगर शहरातील दिल्ली गेट, नेप्ती नका, आयुर्वेद कॉलेज रोड, माळीवाडा, सावेडी सह शहरातील अन्य रस्त्यावर नाकाबंदी करून लॅाकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणारे व मोकाट फिरणाऱ्यांना चांगलीच अद्दल घडविली जात होती.


 नगर शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालल्याने अहमदनगर पोलिसांनी आता कडक पावले उचलली असून मोकाट फिरणारांना आता चाप बसणार आहे. तोंडाला मास्क न लावणे, विनाकारण रस्त्यावर मोकाट फिरणे , गर्दी करणे , सोशल डिस्टन्स न पाळणे आदी वर्तनांबद्दल आता गुन्हे दाखल करायला सुरवात करण्यात आली आहे.


नगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे मार्गदर्शनाखाली  तोफखाना, कोतवाली व भिगार पोलिस ठाण्याचे अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. पत्रकार येथील चौकात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. यावेळी वाहतूक पोलिस कर्मचारी यांनी तपासणी नाक्यांवर वाहनांची कडक तपासणी करण्यात येत होती

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only