Thursday, May 6, 2021

विमानाद्वारे ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरू विभागीय आयुक्त गमे
 नगर दि 6 प्रतिनिधी


नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी  rt-pcr टेस्ट ही जास्त प्रकारे व्हायला पाहिजे मात्र ती होत नाही ही गंभीर बाब आहे. आगामी काळामध्ये त्या जास्तीत जास्त टेस्ट वाढवण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहे, तसेच जे कुणी मोकार रस्त्यावर फिरत असतात अशांच्या संदर्भांमध्ये त्यांची सुद्धा चाचणी करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी जिल्हा पोलीस अधीक्षक करणार आहे. ऑक्सीजन करता आता विमानाद्वारे ऑक्सिजन गुजरात वरून आणण्यासाठी सुद्धा प्रशासनाने तयारी सुरू केली असल्याची माहिती नाशिकचे विभागीय आयुक्त राधा कृष्णा गमे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.


जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये आज आढावा बैठक झाल्यानंतर ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निश्चित आदींसह अधिकारी यावेळी उपस्थित होते.


विभागीय आयुक्त गमे म्हणाले की, कोरोना चाचणी  तपासणी येथे दहा दिवस म्हणावी अशी  होत नाही, दररोजची रुग्ण संख्या ही चार हजाराच्या आसपास आहे. म्हणजे आपल्याला किमान 80000 चाचण्या तरी केल्या पाहिजे असे सिद्ध होते, पण सध्या आरटीपीसी टेस्ट किट उपलब्ध नाही, त्यामुळे टेस्ट होत नाही ही बाब गंभीर आहे. त्यामुळे त्या उपलब्ध करून टेस्ट वाढवाव्यात अशा प्रकारचे निर्देश दिले असल्याचे आयुक्त गमे यांनी यावेळी सांगितले.

 त्यासाठी काय करावे लागेल ते करा, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जे जे काही करायचं त्याचं नियोजन केल्यास त्याचा उपयोग होईल. जे रस्त्यावर मोकाट फिरत आहे अशा संदर्भात आता जिल्हा पोलीस अधीक्षक यांना अश्यांची टेस्ट जागेवर करणार आहे जर त्यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळले तर त्यांना तात्काळ विलगिकर कक्षात आणले जाणार असून त्याची अंमलबजावणी जिल्हा पोलिस अधीक्षक करणार असल्याचेही आयुक्त गमे म्हणाले.


 उच्च न्यायालय मध्ये उपाययोजना व अन्य विषयासंदर्भात पण एक प्रकरण दाखल झाले  आहे त्यामध्ये न्यायालयाने सरकार प्रयत्न करत आहे लोकांनी पण साथ दिली पाहिजे आणि नियम पाळत नसतील आणि सरकारने कितीही प्रयत्न केले तरी कठीण आहे, त्यादृष्टीने लोकांना पण शिस्त लावून द्या, तेथे गरज आहे तेथे पोलिसांनी शिस्त लावली  पाहिजे व त्यासंबंधी पण चर्चा झालेली आहे असे ते म्हणाले.


ऑक्सिजन प्रश्न बऱ्यापैकी आता आपला मार्गी लागलेला आहे ,आपल्याला अगोदर 40 टन मिळत होता नंतर आपल्याकडे 50 टन  मिळत आहे, अतिरिक्त एक टॅंकर आम्ही जामनगर गुजरात मधला  मागवत आहोत ,  नगर  किंवा काही कुठून मिळेल का त्याचे प्रयत्न करतोय, आम्ही नाशिक या ठिकाणी विमानतळ आहे, तिथून आम्ही विमानाने काही रिकामे टॅंकर ऑक्सिजनचे गुजरात मध्ये पाठवता येतील का व नंतर तो रोड मार्गे आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे असे ते म्हणाले.


कोपरगाव राहाता, संगमनेर,तिकडच्या  अनेक लोक मला नाशिक येथे  बेडची  मागणी करतात बेड शिल्लक नाही हे मान्य केल पाहिजे, आपण नियोजन करा जास्तीत जास्त वेळ  ऑक्सीजन बेड कसे  करता येईल याचे नियोजन केले पाहिजे, दिनांक 16 तारखेनंतर आपल्याला एक हजार ऑक्सिजनचे बेड तयार करायचे आहेत त्या प्रकारचे निर्देश जात दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . प्रत्येक तालुक्यात शंभर कॉन्सन्ट्रेट असतील तर ते आम्ही विकत घ्या असे सांगितले आहे, काँन्स्टर असेल तर त्याला सिलेंडर लावा लागत नाही  आता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याला तसे करता येईल का  त्याची तयारी करा असे निर्देश दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .


Dura सिलेंडर जर आपल्याला बसवता आले तर त्याचा निश्चितपणे फायदा होतो हे सिलेंडर म्हणजे जंबो सिलेंडर असते जे 35 लहान सिलेंडर आहे त्याचा एक सिलेंडर म्हणजेच dura सिलेंडर, त्यामुळे त्याचा फायदा ग्रामीण रुग्णालय सह इतर रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात होतो म्हणून आता प्रत्येक तालुक्यामध्ये हे सिलेंडर बसवता येईल का याबाबतचा निर्णय सुद्धा घेण्यास सांगितले आहे असेही गमे यांनी सांगितले .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only