Sunday, May 2, 2021

प्लाझ्मा दान करण्यासाठी नगरवासियांनी पुढाकार घ्यावा व रुग्णांची मदत करावी....अहमदनगर महानगरपालिका सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांचे आवाहन
प्लाझ्मा दान करण्यासाठी नगरवासियांनी पुढाकार घ्यावा व रुग्णांची मदत करावी....अहमदनगर महानगरपालिका सभागृह नेते रवींद्र बारस्कर यांचे आवाहन

           राज्यभरामध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत.  आपण सर्वांनी आता त्या रुग्णांना वाचविण्यासाठी काही ना काही मदत केली पाहिजे. त्यामुळे ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांनी आता 28 दिवसानंतर प्लाझ्मा दान करावा व जेणेकरून त्याचा उपयोग त्या रुग्णाला होईल व त्याचे प्राण वाचतील. म्हणून आता अशा व्यक्तींनी पुढे येऊन  प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन सभागृहनेते रवींद्र बारस्कर यांनी केले आहे

            कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली असतांना अनेक रुग्ण उपचार घेत आहे, अनेकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे व ते बरेच सुद्धा झालेले आहेत. त्यांना २८ दिवसानंतर तीन महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करता येतो. ज्यांना कोरोना होऊन गेलेला आहे, त्यांनी 28 दिवसानंतर प्लाझ्मा दान केला पाहिजे व तो केल्यानंतर त्याचा उपयोग अनेक रुग्णांना निश्चित प्रकारे होऊ शकेल म्हणून आता अशांनी पुढे येणे गरजेचे आहे, 
             बारस्कर पुढे म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ज्याप्रकारे तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा अशी घोषणा झाली होती, त्याच धर्तीवर आता आपल्याला प्लाझ्माविषयी काम करावे लागणार आहे. 
       ज्यांनी लस घेतली  आहे,  त्यांना प्लाझ्मा दान करता येत नाही.  मात्र ज्यांना करोना होऊन गेलेला आहे, त्यांना तीन महिन्यापर्यंत प्लाझ्मा दान करता येते. आपण एखाद्याला जर जीवनदान देण्यासाठी उपयोगी पडलो तर आयुष्यभर ती व्यक्ती आपल्या नावाची आठवण काढील.  म्हणून आता ही चळवळ म्हणून पुढे यायला पाहिजे व त्यातून त्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना एक प्रकारे ती मदतच होईल, असे बारस्कर यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only