Sunday, May 30, 2021

पदोन्नतीत आरक्षण मिळण्यासाठी आरपीआयची आंदोलनाची घोषणा 1 ते 7 जून पर्यंत राज्यभर होणार आंदोलन अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्याचे नियोजनपदोन्नतीत आरक्षण मिळण्यासाठी आरपीआयची आंदोलनाची घोषणा

1 ते 7 जून पर्यंत राज्यभर होणार आंदोलन

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालया समोर आंदोलन करण्याचे नियोजन। नगर । दि.30 मे । पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 जून ते 7 जून पर्यंत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर अमदनगर जिल्ह्यात देखील शहर व तालुकास्तरावर आंदोलन केले जाणार असून, जिल्ह्यातील आरपीआयचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा प्रसिध्दीप्रमुख अमित काळे यांनी दिली.

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घेण्याची प्रमुख मागणीसाठी आरपीआयने आंदोलनाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्‍नी महाविकास आघाडी चा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार ठरल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्ह्यात होणारे आंदोलन आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. सदर आंदोलन कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता होणार आहे. जिल्ह्यातील सर्व आरपीआयच्या कार्यकर्ते व तालुकाध्यक्षांना आपल्या तालुक्यातच आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only