Saturday, May 29, 2021

वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे विजेचे खांब उन्मळून पडले नगर धक्कादायक ! वीज कोसळून महिलेसह चार शेळ्यांचा मृत्यूनगर दि 30 प्रतिनिधीनगर  संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार येथे विज पडून एका महिलेसह चार शेळ्या मृत्यूमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली.या दुर्घटनेत अनिता उर्फ मुक्ताबाई संजय वनवे (वय 39, रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर) यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरु झाला. वादळी वार्‍यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.


त्याच दरम्यान विजेचा कडकडाड होत होता. अनिता वनवे ही महिला घरापासून जवळच असलेल्या शेतात शेळ्या चारण्यासाठी गेली होती.

दरम्यान पाऊस सुरु झाल्याने ति शेळ्यांना घेवून लिंबाच्या झाडाखाली उभी राहिली होती. त्याच दरम्यान लिंबाच्या झाडावर विज कोसळली.

झाडा खाली उभी असलेली महिला व चार शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

 जिल्ह्यात गेल्या चार दिबासांपासून पावसासह जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला होता. यातच जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासूनच ढग दाटून आले होते. व रात्रीच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली . यातच श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात काल वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला.

या पावसामुळे काही ठिकाणी विजेचे खांब उन्मळून पडले तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


दरम्यान वादळमुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान तालुक्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली.

खानापूर परिसरात बिगर मोसमी पावसाने वादळात शेतातील घराचे छतावरील पत्रे उडून गेले तर विजेचे खांब उन्मळून पडल्राने अनेक शेतकर्‍रांचे नुकसान झाले.


घरावरील पत्रे उडून गेली :- वादळी पावसानेत खानापूर शिवारात बाळासाहेब बाबुराव आदिक, अशोक दगडू पंडीत रांचे घराचे पत्र्याचे छत उडून गेल्राने प्रचंड नुकसान होऊन संसारोपरोगी सामान उघड्यावर आले. तर वरूण बाबासाहेब आदिक रांच्रा शेतातील रोहित्रासह बाजुच्रा शेतकर्‍राचे शेतातील विजेचे खांब जमिनदोस्त झाल्याने या भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only