Thursday, May 6, 2021

योग्य वेळी ,योग्य पेशंटला ते इंजेक्शन दिले तरच त्याचा उपयोग होतो नाहीतर त्या इंजेक्शन चा उपयोग म्हणावा असा होत नाही.नाशिकचे विभागीय आयुक्त राधा कृष्ण गमे

  रॅमिडिसिवर काही रामबाण औषध नाही, त्याच्यामुळे जीव वाचतो असे नाही, असे ट्रान्सफोर्स ने  सांगितलेले आहे, यासंदर्भातला काय जो निर्णय घ्यायचा आहे तो डॉक्टरांना घेऊ द्या , योग्य वेळी ,योग्य पेशंटला ते इंजेक्शन दिले तरच त्याचा उपयोग होतो नाहीतर त्या इंजेक्शन चा उपयोग म्हणावा असा होत नाही असा सुद्धा विषय पुढे आलेला आहे .जास्त इंजेक्शनचा भडीमार झाला तर संबंधित कोरोना रुग्णाला एक महिन्यानंतर त्याचा त्रास जाणवू लागतो, वेळप्रसंगी त्या रुगणाचा डोळा काढावा लागला, कानाने ऐकू येत नाही, यासह विविध प्रकारचे आजार आता दिसू लागले आहे, त्याचे इन्फेक्शन सुद्धा आता सर्वत्र जाणवू लागले आहे, असेही ते म्हणाले.  पूर्वी इंजेक्शन आपल्याला पावडर मध्ये येत होते आता ते लिक्विड मध्ये सुद्धा मिळणार आहे आज पासून त्याचे वाटप होणार आहे .हे इंजेक्शन  काही प्रमाणामध्ये येत आहेत असेही  नाशिकचे विभागीय आयुक्त राधाा कृष्ण गमे   म्हणाले

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only