Monday, May 3, 2021

लसीसाठी नगरमध्ये रस्ता रोको.कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण नगर शहरात सलग तिसऱ्या दिवशी फसले

 लसीसाठी नगरमध्ये रस्ता रोको

नगर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण नगर शहरात सलग तिसऱ्या दिवशी फसले. अहमदनगर महापालिकेच्या महात्मा फुले आरोग्य केंद्रावर सलग तिसऱ्या दिवशीही नागरिकांना लस मिळाली नाही. त्यामुळे केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी गोंधळ घातला. त्यानंतरही लस उपलब्ध न झाल्याने संतप्त नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. जोपर्यंत लस मिळणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भावना येथे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी बोलून दाखवली. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा गोंधळ उडाला. आंदोलनस्थळी पोलिस दाखल झाले होते. पोलिसांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामध्ये बराच वेळ चालला गेला. यातूनच कोरोना प्रतिबंधात्मक नियमाचा फज्जा उडाला. सुरक्षित अंतराच्या नियमाचे उल्लंघन या आंदोलनामुळे झाले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only