Thursday, May 27, 2021

वाळकी रेशन दुकानांमध्ये अफरातफर मुद्देमाल हस्तगत

 नगर दिनांक 28 प्रतिनिधी 

अन्न धान्य ह्यात तफावत व फेरफार केल्याचे आढळुन आल्याने नगर तालुक्यातील वाळकी येथील दुकानदारा बद्दल नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान तपास करण्यात आलेला गहू तांदूळ पोलिसांनी हस्तगत केलेला आहेआरोपीचे नाव-अरुण शिवाजी बोठे रा.वाळकी  नगर असे आहे


यातील फिर्यादी मजकुर हे पुरवठा निरीक्षक असून यातील आरोपी याचे वाळकी शिवारात स्वस्थ धान्य दुकान  असून यातील दुकानातील स्वस्थ धान्य दुकानाचा पंचनामा केला असता त्यात सदरचे अन्न धान्य ह्यात तफावत व फेरफार केल्याचे आढळुन आल्याने सविस्तर पंचनामा करून तफावत झालेले मालाचे वर्णन-गहू-3691 किलो  कमी ,तांदूळ -4473 किलो कमी,साखर - 67.5 किलो जास्त,मका- 236 किलो जास्त,चना डाळ -248 किलो आढळून आला आहे.


या प्रकरणी - वैशाली गजानन शिकारे 35 वर्षे धंदा- नोकरी नेम - पुरवठा निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली या संदर्भाने नगर तालुका पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only