Friday, May 21, 2021

रिक्षा चालकांना मिळणार दीड हजार परिवहन कार्यालय : ऑनलाईन माहिती भरणे केले बंधनकारक

 रिक्षा चालकांना मिळणार दीड हजार

परिवहन कार्यालय : ऑनलाईन माहिती भरणे केले बंधनकारक


। नगर । दि.22 मे । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनमध्क्या परवानाधारक रिक्षा चालकांना दीड हजारांची मदत जाहीर केली आहे. ही मदत अद्याप रिक्षा चालकांना मिळाली नाही. शनिवारपासून रिक्षा चालकांना ही मदत मिळण्यास सुरूवात होणार आहे. परंंतु, यासाठी परवानाधारक रिक्षा चालकांना ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर मदत मिळणार आहे. रिक्षा चालकांना ही माहिती कशी भरायची यासाठी नगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.


मुख्यमंत्र्यांनी रिक्षा चालकांना दीड हजार रूपयांची मदत जाहिर केली होती. मदतीची घोषणा होऊन महिना झाला तरीही रिक्षा चालकांच्या बँक खात्यावर दीड हजार रूपक्या आलेले नाहीत. अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नगर शहरासह नगर तालुका, शेवगाव, कर्जत, जामखेड, पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यातील तीन हजार 520 रिक्षाचालकांची नोंद आहे. अशा परवानाधारक रिक्षा चालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दीड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाणार आहे.


यासाठी रिक्षाचालकांनी आपला आधार क्रमांक बँक खात्याला संलग्न केलेला असणे आवश्यक आहे. मदत खात्यावर जमा होण्यासाठी आयसीआयसीआय बँकेतर्फे स्वतंत्र संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीवर परवानाधारक रिक्षाचालकांना 22 मे पासून ऑनलाईन अर्ज करता क्याणार आहेत. अर्ज कसा करावा याचे प्रशिक्षण आधी परिवहन कार्यालयातील कर्मचार्यांना दिले जाणार आहे. यानंतर रिक्षा चालकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. जेणे करून संबंधित रिक्षा चालकांना आपली माहिती तात्काळ भरता क्याईल व त्यांना दीड हजार रूपयांचे अनुदान मिळेल, अशी व्यवस्था परिवहन कार्यालयाकडून केली जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only