Wednesday, May 5, 2021

मराठा आरक्षणाबाबत आता राज्यपातळीवर निर्णय गरजेचा आ.रोहित पवार यांचे मत, राजकारण न करण्याचे आवाहन

 नगर-दि 5 प्रतिनिधी

 मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर भाष्य करणार नाही, पण आता राज्य सरकारमध्ये सत्तेत असणारे सगळे नेते आणि विरोधी पक्षनेते यांनी एकत्रित बसून मराठा समाजामध्ये असणाऱ्या युवा वर्गाच्या हिताचा वेगळा निर्णय आपल्या राज्य पातळीवर आपल्याला कसा देता येईल याबाबत विचार करणे जरूरीचे आहे व त्याच्यात राजकारण कोणीही करू नये, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जमखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले.


पवार म्हणाले, निकालाचा मी खूप अभ्यास केलेला नाही पण तरी कळते की त्याच्या मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण द्यायला सुप्रीम कोर्ट नकार दिलेला आहे.
आरक्षण मिळाले असते तर लोकांना त्याचा फायदा झाला असता. जे वकील आधीच्या सरकारने दिले होते, तेच आताही होते. आपण केलेला युक्तिवाद सुद्धा योग्य पद्धतीने झालेला आपण सर्वांनी बघितला आहे. पण शेवटी सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो, असे सांगून ते म्हणाले, निकाल दुसऱ्या बाजूला झाला असता, ज्याची अपेक्षा आपण सर्वजण करतोय तर ती चांगलीच गोष्ट झाली असती, पण आता तर त्याच्यावर आपल्याला जास्त भाष्य करता येत नाही, आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत म्हणजे सरकारच्या, त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सगळ्यांनी बसून विरोधी पक्ष असेल आणि सत्ताधारी असणारा पक्ष कोणीही राजकारण करू नये.  शेवटी हा लढा मराठा समाजामध्ये असणाऱ्या मुला-मुलींनी व लोकांनी तो उभा केला होता. त्याच्या मागे कुठलेही राजकीय ताकद नव्हती ,त्यामुळे सगळ्यांनी याच्यात राजकारण न आणता योग्य निर्णय घ्यावा, असे युवक म्हणून मी विनंती करतो असे पवार म्हणाले.


 पश्चिम बंगाल मध्ये झालेल्या यांच्या हिंसे बद्दल बद्दल बोलताना पवार म्हणाले राजकारण किती आहे ते  लोकांना त्या गोष्टी माहिती आहे, या। ठिकाणी बॅनर्जी होणारे मुख्यमंत्री आहे,  गव्हर्नर सांगुन वेगळा निर्णय होतो की काय असं जनतेला वाटत असावे पण कुणीही कायदा हातात घेऊ नये व तिचे असो अथवा इथे असो असे पवार म्हणाले.

 इंजेक्शनच्या संदर्भामध्ये आपले नाव सुद्धा आलेले आहे यासंदर्भात विचारले असता आतापर्यंत नोटीस आतापर्यंत आलेली नाही नोटीस आल्यानंतर उत्तर दिले जाईल असेही त्यांनी सांगितले जी बाब न्यायप्रविष्ट आहे त्याच्यावर जास्त बोलणे उचित होणार नाही असे रोहित पवार म्हणाले

 बारामती ॲग्रो या कंपनीने निर्णय शासनाने मदत करण्याची भूमिका घेतलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये  रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालल्यामुळे नागरिकांना त्याचा फायदा व्हावा या दृष्टिकोनातून ऑक्सिजनच्या पुरवठा करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे काही आवश्यक त्या बाबीसुद्धा त्यांनी उपलब्ध करुन दिलेल्या आहेत फुल न फुलाची पाकळी त्यांनी यामध्ये दिली आहे निश्चितपणे  प्रशासनाला व रुग्णांना त्याची मदत होईल असेही पवार म्हणाले


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only