Thursday, May 13, 2021

रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये आज पोलिसांनी शहरातील तसेच उपनगरातील मुख्य मार्गावर पोलीस संचलन
 नगर दिनांक 13 प्रतिनिधी रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर नगर शहरामध्ये आज पोलिसांनी शहरातील तसेच उपनगरातील मुख्य मार्गावर पोलीस संचलन केले.


उद्या सर्वत्र रमजान ईद साजरी केली जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यामध्ये बंदोबस्त ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहे. प्रत्येक ठिकाणी चोख असा पोलिस बंदोबस्त सुद्धा करण्यात आला असून महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलाच्या तुकड्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.


आज शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या नेतृत्व खाली  नगर शहरामध्ये   तोफखाना,कोतवाली , भिंगार कॅम्प, नगर तालुका, व वाहतूक शाखा पोलिसांच्या पथकाने व त्यांच्या समवेत राज्य राखीव दलाच्या पोलिसांनी नगर शहरातून संचलन केले नगर शहरातील मुख्य अशा दिल्ली गेट, चितळे रोड ,नवी पेठ कापड बाजार तेलिखुंट, सर्जेपुरा ,कोठला परिसर या ठिकाणी संचलन केले तर दुसरीकडे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत शहरातील मुख्य मार्गावर सुद्धा हे संचलन करण्यात आले होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only