Wednesday, May 5, 2021

नगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले पूर्वीचे गुन्हे व त्यांची संख्या पाहता त्या गुन्हा चा निपटारा करण्याची तयारी पोलिसांनी केली असून आत्तापर्यंत अनेक वर्षांपासूनची सुमारे 24 हजार गुन्हे याचा निपटारा

 नगर दिनांक 5 प्रतिनिधी -वर्षानुवर्षापासून प्रलंबित असलेले गुन्हे व नागरिकांचे अर्ज निकाली काढण्याची विशेष मोहीम पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी हाती घेतली आहे. नगर जिल्ह्यामध्ये दाखल झालेले पूर्वीचे गुन्हे व त्यांची संख्या पाहता त्या गुन्हा चा निपटारा करण्याची तयारी पोलिसांनी  केली असून आत्तापर्यंत अनेक वर्षांपासूनची सुमारे 24 हजार गुन्हे याचा निपटारा केलेला आहे. गुंज व अर्ज प्रलंबित राहण्याबाबत आत्तापर्यंत ज्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेला आहे अशा तीन पोलिस ठाण्यातीलअधिकारी व कर्मचारी मिळून 210 पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.


नगर जिल्हा हा भौगोलिक दृष्टीने सर्वाधिक मोठा जिल्हा असल्यामुळे याठिकाणी पूर्वीचे अनेक गुन्हे प्रलंबित आहे, त्या गुन्ह्यांची माहिती गेल्या काही महिन्यापासून घेण्यात येत होती. जे गुन्हे व नागरिकांचे अर्ज प्रलंबित राहत होते, त्याची काय कारणे आहेत हे शोधण्यात आली होती व त्याचा निपटारा करण्याचे आदेध देण्यात आलेले होते. त्यानुसार गेल्या सहा महिन्यापासून या कमला वेग आलेला आहे. यात 24 हजार गुन्हे निपटारा झाला आहे उर्वरित जे गुन्हे आहेत, तेसुद्धा लवकरात लवकर त्याचा निपटारा करावा अशा प्रकारच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत


अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करून घेतले जात नव्हते किंवा अर्ज घेण्यात येत होते पण त्यावर कारवाईची अंमलबजावणी होत नव्हती. त्या अर्जांबाबत सुधारणा करण्याचे आदेश दिल्यानंतर आता कुठेही अर्जाची पेंडन्सी राहिलेली नाही. जे प्रकरण दाखल करायचे असतात, ते तात्काळ दाखल केले जातात, असेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले. एखादा अर्ज आल्यावर जो गुन्हा खरच आहे की नाही याची पडताळणी करायचे असेल तर सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशाचा उल्लेख करत संबंधित पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी पंधरा दिवसांमध्ये त्या अर्जाचा निपटारा करून त्याबाबतचा निर्णय घ्यायचा आहे असे जिल्ह्यामध्ये सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिलेले आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.


दाखल करा किंवा कारण द्या 


पोलीस ठाण्यामध्ये येणाऱ्या अर्जामध्ये गुन्हा दाखल करणे व समजा त्या अर्जातील मजकुरानुसार गुन्हा दाखल होतो की नाही हे पंधरा दिवसात तपासून त्यावर निर्णय घेणे बंधनकारक केले गेले आहे.पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या अर्जांपैकी दखलपात्र, अदखलपात्र, व्यक्ती हरवला, वस्तू हरवली, अकस्मात मृत्यू, अकस्मात जळीत असे गुन्हे दाखल होतात. याव्यतिरिक्त येणाऱ्या अर्जामध्ये गुन्ह्याचा प्रकार होतो की नाही हे पंधरा दिवसात तपास करून आवश्यक कार्यवाही करणे तसेच एखाद्या दाखल गुन्ह्याचा तपास व्यवस्थित होत नसल्याबद्दल किंवा पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वर्तनाबद्दल तक्रारी असतात. त्यांचाही पोलीस ठाण्याच्या स्तरावरच निपटारा करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only