Tuesday, May 18, 2021

कारवाईसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर

 

नगर दिनांक 18 प्रतिनिधी 


करोना रुग्णांची वाढ लक्षात घेता आता जिल्हा पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई तसेच करोना चाचणी ,वाहन जप्त करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता नगर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे स्वतः कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत .आज नगर शहरातील पत्रकार चौकामध्ये मोठा फौजफाटा यावेळी होता. अनेक वाहनांची तपासणी करण्यात येत होती.जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत चालली असतानाच दुसरीकडे मोक्कार फिरण्याची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे ,त्यामुळ नगर जिल्ह्यामध्ये कडक  कारवाई करावी असे आदेश वरिष्ठांनी दिल्यानंतर नगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दोन दिवसांपासून धडक कारवाई मोहीम जिल्ह्यामध्ये सुरू केली आहे. नगर जिल्ह्याच्या सर्व पोलिस ठाण्यांना त्या प्रकारचे आदेश दिल्यानंतर प्रत्येक ठिकाणी ही कारवाई मोहीम सुरू करण्यात आलेले आहे आतापर्यंत पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केलेला आहे.


आज नगर शहरामध्ये अधीक्षक पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून वाहनांची तपासणी सुरू केली कोण कुठल्या भागातून आलेला आहे कोण कुठे चाललेला आहे त्याच्याकडे पास आहे की नाही किंवा तो योग्य पद्धतीने  आहे की नाही याची खातरजमा करून जे विनाकारण फिरत आहेत अशांची तात्काळ कोरोना चाचणी  सुद्धा जागेवरच केली जात आहे आत्तापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये ज्या पोलिसांनी कारवाई केल्या आहेत त्यामध्ये साधारणतः 37  जण हे पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे


आज येथील पत्रकार चौकांमध्ये अधीक्षक पाटील यांच्यासमवेत अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यासह तोफखाना कोतवाली व शहर वाहतूक शाखेचे पोलिस या ठिकाणी होते धडक कारवाई मोहीम सुरू झाल्यामुळे येथून जाणारे चारही रस्ते हे अडविण्यात आले होते व प्रत्येक वाहनांची तपासणी ही करण्यात आली होती अशीच कारवाई जिल्हा भरात करण्याचे आदेश दिल्यामुळे आता दुसरीकडे वाहने जप्त करण्याची मोहीम सुद्धा पोलिसांनी सुरू केली आहे.


चौकट


नगर जिल्ह्यामध्ये पोलीस विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतली असून आत्तापर्यंत ज्या नागरिकांची  आत्तापर्यंत पोलिसांनी  तपासणी जिल्ह्यामध्ये केली, यामध्ये 832 जणांची चाचणी केलेली आहे त्यापैकी 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे अशीच कारवाई जिल्ह्यामध्ये सतत सुरू राहील असे त्यांनी यावेळी सांगितले. झेप पॉझिटिव्ह सापडलेले आहेत त्यांना थेट विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात येणार आहे आपण विनाकारण फिरला तर आपल्या कुटुंबाला सुद्धा त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे जे काही नियम आहेत त्याचे तंतोतंत पालन केले पाहिजे असेही अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only