Monday, May 31, 2021

तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी केला चार कोटी रुपयांचा दंड वसूलनगर दिनांक 31 प्रतिनिधी


गेल्या तीन महिन्यांमध्ये जिल्हा पोलीस दलाने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई मोहीम हाती घेतले असून, जिल्ह्यामध्ये 1 लाख 48 हजार 860 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत चार कोटी 34 लाख सहाशे रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


अधीक्षक पाटील म्हणाले की, जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यापासून पोलीस विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेतलेली होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हाभरात ही कारवाई मोहीम हाती घेण्यात आली होती. आत्तापर्यंत पोलिसांनी 1278 वाहने ही जप्त केलेली आहेत. तर जिल्हाभर 866 जणांना तात्पुरते ताब्यात घेऊन त्यांना सोडून देण्यात आले होते. तर जिल्ह्यात 253 जणांना 188 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटिसाही बजावलेल्या आहेत.


मे महिन्यामध्ये दोन कोटी सात लाख 55 हजार रुपये दंड पोलिसांनी वसूल केलेला आहे. तर मे महिन्यामध्ये 65 हजार 696 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे.


विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली असून त्याची संख्या सहा हजार 472 आहे. सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2852, संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3211 तर कोरोना काळामध्ये बेकायदेशीरपणे दुकाने चालू ठेवली व नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 578 दुकानांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असल्याचे  अधीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले.


चौकट

जे विनाकारण रस्त्यावर बंदीच्या काळामध्ये फिरत होते, अशांच्या तपासण्या सुद्धा पोलिसांनी केलेल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 23 हजार 252 जणांच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहे. त्यापैकी 491 व्यक्ती या पॉझिटिव आढळून आल्या असल्याचेही अधीक्षक पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only