Sunday, May 23, 2021

नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट रस्त्याचे काम सुरु दर्जेदार विकास कामे हाच अजेंठा- आ.संग्राम जगताप नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट रस्त्याचे काम सुरु


दर्जेदार विकास कामे हाच अजेंठा- आ.संग्राम जगताप


अहमदनगर प्रतिनिधी- कोवीडच्या आरोग्य सेवा बरोबरच विकास कामांना प्राधान्यक्रम दिला आहे. फेज टू व अमृत भुयारी गटार योजनेचेच्या कामांना गती दिल्यामुळे ते कामे आज पूर्ण झाल्या मुळे लॉकडाऊनचा उपयोग रस्त्याचे डांबरीकरणाचे कामे हाती घेतली आहे.जुन्या शहरातील बहुतांश रस्त्यांची कामे मंजूर असून ही कामे पावसाळ्याआधी पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या प्रयत्नातून कोठला बस स्टॅन्ड ते रामचंद्र खुंट चौकापर्यंतचे रस्त्याची कामे सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बहुतांश रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत दर्जेदार विकास कामे हाच अजेंठा डोळ्यासमोर ठेवून विकास कामे करीत आहे करीत आहोत, रामचंद्र खुंट हा परिसर बाजारपेठेचा व रहदारीचा असल्यामुळे या रस्त्याचे काम होणे गरजेचे होते.आता ते पूर्ण झाले आहे असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

        प्रभाग क्रमांक दहाच्या नगरसेविका अश्विनी सचिन जाधव यांच्या प्रयत्नातून कोठला स्टँड ते रामचंद्र खुंट चौकापर्यंतच्या रस्ता डांबरीकरण कामाची पाहणी आ. संग्राम जगताप यांनी केली यावेळी स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले,मा.नगरसेवक सचिन जाधव,आनंद नांदूरकर,राजेंद्र कटारिया,विनोद मालपाणी,संजय कासट,डॉ.अरुण राऊत,डॉ.सईद शेख, सत्यम देवळालीकर,दीपक काशीद,कैलास काशीद आदी उपस्थित होते.

         बोलताना मा.नगरसेवक सचिन जाधव म्हणाले की, रामचंद्र खुंट परिसर हा रहदारीचा व बाजारपेठेचा परिसर आहे.जमिनीअंतर्गत भुयारी गटारी चे काम व पिण्याच्या पाण्याचे जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी रस्ते खोदावे लागले असल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली होती त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता आता ही सर्व रस्त्यांची कामे मार्गी लागली आहेत, प्रभागातील टप्प्याटप्प्यांनी सर्व विकासकामे मार्गी लागतील असे ते म्हणाले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only