Thursday, May 6, 2021

कल्याण रोड परिसरात आरोग्य केंद्र, हॉस्पिटल व लसीकरण केंद्र सुरू करावे-नगरसेवक सचिन शिंदे

 कल्याण रोड परिसरात आरोग्य केंद्र, हॉस्पिटल व लसीकरण केंद्र सुरू करावे-नगरसेवक सचिन शिंदेअहमदनगर- प्रभाग क्रमांक 8 मध्ये कल्याण रोड परिसरात मोठी नागरीवस्ती निर्माण झाली आहे. तरीसुद्धा या भागामध्ये आरोग्य व लसीकरण केंद्र सुरू झाले नाही इतर महापालिका भागात आरोग्य केंद्र व लसीकरण केंद्र सुरू झाले आहे मात्र कल्याण रोड परिसरामध्ये लसीकरण केंद्र सुरु झाले नसल्यामुळे नागरिकांना लसीकरणा पासून वंचित राहावे लागत आहे. या भागामध्ये मध्यम कुटुंबातील तसेच गोरगरीब जनता या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व नागरिकांना उपचार घ्यायचे असेल तर जिल्हा रुग्णालय या ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते यासाठी महापालिकेने कल्याण रोड परिसरामध्ये लवकरात-लवकर आरोग्य केंद्र व सुसज्ज हॉस्पिटल उभारावे जेणेकरून याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात होईल तसेच वेळेवर उपचार घेणे सोयीस्कर होईल. महापालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी  लसीकरण केंद्र सुरू झाले आहे मात्र कल्याण रोड परिसरामध्ये लसीकरण केंद्र सुरू न झाल्यामुळे या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. यासाठी कल्याण रोड वरील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मनपाचे  लसीकरण केंद्र सुरू करावे अशा मागणीचे निवेदन आयुक्त शंकर गोरे यांना शिवसेना नगरसेवक सचिन शिंदे यांनी दिले आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only