Tuesday, May 4, 2021

खडकीचे किसन कोठुळे डिजी डिस्क ने सन्मानित
 खडकीचे किसन कोठुळे डिजी डिस्क ने सन्मानित


। नगर । दि.04 मे । खडकी ता.नगर येथील जवान किसन भिवसेन कोठुळे यांस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक (एन डी आर एफ) मध्ये गौरवाची समजल्या जाणार्‍या डिजी डिस्क या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.


किसन कोठुळे याने आपल्या सेवेची सुरुवात केंद्रीय राखीव पोलीस फोर्स (सी आर पी एफ) मधून केली होती. 2015 साली ते एन डी आर एफ मध्ये रुजू झाले. ते सध्या पुणे येथील एन डी आर एफ च्या पाचव्या तुकडी मध्ये सेवेत आहेत.


गुजरात, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या मधील आपत्ती वेळी त्यांनी आणि त्यांच्या तुकडीने  महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. 2019- 20 मध्ये  आशियातील सर्व देशांच्या एन डी आर एफ च्या जवानांचा संयुक्त सराव झाला होता.


त्यावेळी किसन कोठुळे यांनी आपले कौशल्य दाखवले होते.त्याबद्दल  डिजी डिस्क ने सन्मानित करण्यात आले.एन डी आर एफ च्या पाचव्या तुकडीचे कामांडड  अनुपम श्रीवास्तव यांच्या हस्ते त्यांना डिजी डिस्क ने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only