Monday, May 3, 2021

शाळा व कॉलेज यांनी पालकांकडून घेतलेल्या फी परत कराव्यात व चालु वर्षाची फी घेऊ नये अन्यथा आंदोलन.संतोष नवसुपे

 शिव राष्ट्र सेना ( महाराष्ट्र राज्य) :-


               शाळा व काॅलेज कोरोना महामारी मध्ये बंद असल्याने या संस्था पालकांकडून संपूर्ण फी घेत आहेत या काळात सर्व शासकीय नौक-या व व्यापार तसेच सामान्य माणसाला त्याचे चलन व उधार निर्वाह हा ठप्प झालेला असताना व शाळेतील संस्थेला कुठलाच खर्च नसल्याने उदा. स्कुल फी, ड्रेस फी, स्कुल बस फी, बुक्स फी, डोनेशन असा शालेय कुठलाच खर्च नसताना व शाळेचा मेंटनस नसताना लाईटबिल नसताना तरी पालकांना फी भरा म्हणुन शाळा कॉलेज कडून धमकी येतात हे या कोरोना काळात नित्याचे झाले आहे. 

         उलट पक्षी पालकांना आपल्या पाल्यासाठी आॅनलाईन कलास साठी वेगळा मोबाईल घेऊन दयावा लागतो व त्या साठी 1000 रू चार्ज मारावा लागतो. या काळात घरामध्ये कोरोनाचा एखादा पेशंट निघल्यास त्याचा खर्च व पालकांचे सर्व कामे बंद अशा परिस्थितीत शाळा व कॉलेज यांनी पालकांकडून घेतलेल्या फी परत कराव्यात व चालु वर्षाची फी घेऊ नये हा लढा शिव राष्ट्र सेना पक्षाच्या वतीने उभारण्यात आला आहे. वेळ प्रसंगी या विरोधात याचिका दाखल करण्यात येऊन या साठी मोठे आंदोलन उभे करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील कारण न्यायालयाच्या निर्णयाला सुध्दा काही संस्था फी आकारणी करतात हे मोठे संकट पालकांवर व विद्यार्थी वर्गावर आहे सदर शाळा संस्थेने माणुसकी दाखवून योग्य निर्णय घ्यावा 


            संतोष नवसुपे 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only