Monday, May 17, 2021

दुकानांना केले सील पोलीस व महापालिका प्रशासनाची संयुक्तिक कारवाई

 
दुकानांना केले सील पोलीस व महापालिका प्रशासनाची संयुक्तिक कारवाई

नगर दि  17 प्रतिनिधी

 महानगरपालिकेने काल अचानकपणे नगर शहरामध्ये पुन्हा निर्बंध घालून अत्यावश्यक सेवेतील मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे आज ज्यांनी दुकाने उघडली त्यांची एक महिन्यासाठी दुकाने सील करण्यात आले असून यामध्ये आठ दुकानांचा समावेश आहे महानगरपालिका व कोतवाली पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने नगर शहरामध्ये ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली तर दुसरीकडे विनाकारण मोकर फिरत आहे अशांवर सुद्धा ऑंटी जेल चाचणी यावेळी करण्यात आली


काल महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी अचानक पणे मुलगा शहरातील दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता. वास्तविक पाहता कालपासूनच सर्व व्यवहार सात ते अकरा या कालावधीमध्ये सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, काल रात्री आठच्या सुमाराला नवीन आदेश काढून त्यांनी आजपासून दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतलेला होता आणि व्यापाऱ्यांना याची कल्पनासुद्धा नव्हती सकाळीच व्यापारी हे आपापली दुकाने उघडण्यासाठी शहरांमध्ये आलेली होती व त्यांनी आपला व्यवहार सुरू करत असताना दुसरीकडे शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक विशाल ढुमे व कोतवाली यांच्या पथकाने तसेच महानगर पालिकेच्या पथकाने आज सकाळपासून धडाकेबाज कारवाई सुरू केली नगर शहरातील दुकाने उघडी ठेवली होती त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली तर आज दुकानांना एक महिन्यासाठी सील करण्यात आले होते या कारवाईमुळे शहरांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला होता, जर महानगरपालिकेला एवढेच वाटत होते तर त्यांनी किमान एक दिवसाची मुदत अगोदर देणे आवश्यक होते मात्र तसे न करता अचानक पणे केलेली कारवाई ही निंदनीय आहेत असेही बोलले जात आहे.


जिल्ह्यामध्ये मोकाट फिरण्याचे कारवाईसुद्धा पोलिस प्रशासनाने सुरू केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सुद्धा काल अध्यादेश काढून नगर शहरासह जिल्ह्यामध्ये जे कोणी मोकार  फिरत आहेत याची तात्काळ तपासणी करावी व त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या कुटुंबाची सुद्धा टेस्ट करावी अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत व त्याची अंमलबजावणी असा का पासून सुरू करण्यात आले आहेत शहरातील दिल्लीगेट, चितळे रोड कापड बाजार, जुने बस स्थानक यांच्यासह पत्रकार चौक या महत्त्वाच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवून या ठिकाणी चाचण्या करण्यात आलेले आहेत किमान आज दीडशेहून अधिक चाचण्या नगर शहरांमध्ये करण्यात आलेल्या आहेत यांचे अहवाल रात्री उशिरापर्यंत प्राप्त होणार आहेत.चौकट


 महानगरपालिकेचे प्रशासन अतिशय गोंधळलेल्या अवस्थेत मध्ये आहे गेल्या चार दिवसापासून त्यांनी वेगवेगळे प्रकारचे निर्णय घेतले खरे मात्र ते निर्णय त्यांनाच कशा पद्धतीने घेतले समजू शकले नाही सर्व व्यवहार सुरळीत करण्याचा निर्णय घेतला खरा मात्र आज सकाळपासूनच पुन्हा निर्बंध घातल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे एक महिना झाला तरीही जनजीवन सुरळीत होत नाही मग प्रशासन करते काय असा सवाल अनेकांनी उपस्थित केलेला आहे


चौकट

नगर जिल्ह्यामध्ये रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे वास्तविक पाहता प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज होती मात्र प्रशासन फक्त बैठका बैठका घेत आहे मात्र त्यांना यात काय करावे के निर्णय घ्यायला पाहिजे,हे काळायला तयार नाही , शहर व जिल्हा असे वेगळे विभाग करून शहराची जबाबदारी आयुक्त आहे व याचे प्रमुख आहेत असे सांगितले मात्र शहरांमध्ये सुद्धा आज निर्णय घेताना मोठी कसरत महानगरपालिकेच्या प्रशासनाचा करावी लागत आहेत त्यामुळे प्रशासन सुद्धा हतबल झाल्याचे आता दिसून येत आहे.


चौकट


म्हातारपणी आज बंद केल्यामुळे नगर शहरातील सर्व रस्ते हे ओस पडले होते सकाळ नंतर गर्दी हटविण्यात आल्या नंतर व तसेच कारवाई केल्यानंतर शहरांमध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता व अनेक रस्ते हे निर्मनुष्य दिसून येत होते

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only