Wednesday, May 26, 2021

20 टक्के बेड राखीव ठेवून उपचार केले नाही चौकशी करून कारवाई करा; शाकीरभाई शेख यांची मागणी20 टक्के बेड राखीव ठेवून उपचार केले नाही

चौकशी करून कारवाई करा; शाकीरभाई शेख यांची मागणी

नगर -

अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील खाजगी रुग्णालयांनी अतिरिक्त चटईक्षेत्र निर्देशांकाचा लाभ घेताना दारिद्रय रेषेखालील रुग्णांना 20 टक्के बेड राखीव ठेवून मोफत औषधोपचार केलेला नाही. त्याबाबत चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील पुढील खाजगी रुग्णालये जैन सौशल फेडरेशन फौंडेशन

संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नोबेल मेडीकल अँड रिसर्च सेंटर (मूळ नाव व बदललेले नाव एशियन नोबल हॉस्पिटल), साईदिप हेल्थ केअर अँड रिसर्च प्रा.लि. संचलित साईदिप हॉस्पिटल, श्री वरद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा.लि. प्रत्यक्षात चालू असलेले हॉस्पिटल मॅक्सकेअर हॉस्पिटल, सय्यद फय्याज हाजीमीर अजिमोद्दीन कविजंग जहागिरदार यांचे नावाने मंजूर प्रत्यक्षात सुरभी हॉस्पिटल प्रा.लि. या रुग्णालयांनी बांधकाम परवानगी घेताना अहमदनगर महानगरपालिकेकडून वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकाचा लाभ घेतलेला आहे. तथापि, सदरची वाढीव क्षेत्र निर्देशांकाची मंजूरी देताना ड वर्ग महानगरपालिकेकरीता विकास नियंत्रण नियमावलीमधील टेबल क्र.14 मधील अटी व शर्तीनुसार एकूण खाटांचे संख्येपैकी 20% खाटा या आर्थिकदृष्टया दुर्बल व दारिद्रय रेषेखालील रुग्णांकरीता राखीव ठेवून मोफत व सवलतीच्या दरात उपचार करणे, त्याचबरोबर बाह्य रुग्ण विभागातील 10 टक्के रुग्णांना सवलतीत म्हणजे शासकीय रुग्णालयांना उपचाराकरीता आकारण्यात येणारे दराने शुल्क आकारण्यात येणे बंधनकारक आहे. सवलतीच्या व मोफत उपचार केलेल्या रुग्णांच्या नोंदी व तपशीलाचे विवरण संचालक, आरोग्य विभाग यांच्याकडे सादर करणे. या

रुग्णालयांवर बंधनकारक असताना त्याप्रमाणे कोणतीही कार्यवाही आजतागायत केली गेलेली नाही.

कोविड-19 महामारीच्या काळात सन 2020 ते 2021 पावेतो वरील रुग्णालयांमध्ये उक्त नमुद केलेल्याप्रमाणे 20 टक्के खाटा राखीव ठेवून आर्थिकदृष्टया दुर्बल व दारिद्र्य रेषेखालील रुग्णांवरती उपचार केलेले नाही व बाह्यरुग्ण कक्षात सवलतीच्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक गरजू रुग्णांना सदर योजनांचा लाभ न मिळाल्याने उपचाराअभावी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. सदर रुग्णालयांनी अशा गरजू लाभार्थी रुग्णांना उपचार न दिल्याने उपचाराकरीता त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयाशिवाय पर्याय राहिला नाही. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मनुष्यबळ, खाटांची संख्या, उपचार साधणे हे अत्यंत मर्यादित असल्यामुळे त्यांना उपचारापासून वंचित होण्याची वेळ आली. सदरची बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची आहे. वर नमुद रुग्णालयांनी बांधकाम परवानगी घेताना उक्त नमुद महत्वाच्या अटी व शर्तीचे पालन न केल्याने त्यांच्याकडून नियमाचे उल्लंघन झालेले आहे. त्यामुळे वरील 5 रुग्णालयांच्या विरोधात आपण दखल घेऊन कारवाई करणे अपेक्षित होते. आपल्याकडूनही सदर अधिकाराचा वापर झालेला नाही व यापूर्वी अहमदनगर महानगरपालिका व शासनाकडे पाठपुरावा करुनही सदर रुग्णालयांविरोधात कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. शासनाने आयुक्त, मनपा, अहमदनगर यांना ता. 20/1/2020 रोजी पत्र पाठवून आवश्यक कारवाई करण्याबाबत सूचित करुनही आयुक्तांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.

तरी आपण वर नमुद केलेल्या वस्तुस्थितीची गांभीयपुर्वक दखल घेऊन वरील पाच रुग्णालयांना मंजूरी दिल्यापासून ते आजपावेतो आर्थिकदृष्टया मागासलेले व दारिद्रय रेषेखालील किती रुग्णांना शासनाच्या नियमानुसार लाभ दिलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 कक, उपकलम 4 मधील घ च्या तरतूदीअन्वये आरक्षीत ठेवलेले किंवा राखून ठेवलेले टक्केवारीतील रुग्ण म्हणून रुग्णाला प्रवेश देण्यापूर्वी किंवा त्याच्यावर उपचार करण्यापूर्वी त्या प्रयोजनार्थ ठेवलेली नोंदवहीमध्ये विहित नमुन्यात रुग्णांची नोंद घेणे प्रत्येक रुग्णालयावर बंधनकारक आहे. अशा नोंदवहीची आपण पडताळणी करून ज्या रुग्णांना औषधोपचार मोफत अमर सवलतीच्या दरात केलेला आहे अशा रुग्णांशी संपर्क करुन त्यांचे जबाब नोंदविण्यात यावे व त्यांच्याकडून खातरजमा करण्यात यावी. सदर रुग्णालयास आपण तात्काळ पुढील प्रमाणे निर्देश द्यावेत त्यांनी एकूण खाटांपैकी 20 टक्के आरक्षीत खाटांवरती फलक लावण्यात यावेत व त्याची माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागावर प्रदर्शीत करण्यात यावी व सदर आरक्षीत व राखीव खाटांवर अपात्र रुग्णांना उपचार देण्यास मनाई करावी. बाह्यरुग्ण ओपीडी येथे 10 टक्के रुग्णांना सवलतीत उपचार देण्याबाबत सक्तीची ताकीद देण्यात यावी. वरील प्रकरणी सखोल चौकशी होऊन रुग्णालयांच्याव

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only