Monday, May 31, 2021

आम्हाला लस विकत द्या. आम्ही नागरिकांना मोफत लस देवू- शिवसेनेची मागणी राष्ट्रवादी व भाजपा संबंधितांना लसीकरण उपकेंद्रे दिली; शिवसेना नगरसेवकांचा आयुक्तांना घेराव लसीकरण उपकेंद्रांबाबत भेदभाव.आम्हाला लस विकत द्या. आम्ही नागरिकांना मोफत लस देवू- शिवसेनेची मागणी

 


 आम्हाला लस विकत द्या. आम्ही नागरिकांना मोफत लस देवू- शिवसेनेची मागणी


राष्ट्रवादी व भाजपा संबंधितांना लसीकरण उपकेंद्रे दिली; शिवसेना नगरसेवकांचा आयुक्तांना घेराव

लसीकरण उपकेंद्रांबाबत भेदभाव.
नगर ः लसीकरणावरून राज्य व केंद्रात रोज आरोप-प्रत्यारोप होत असताना महाविकासआघाडी सरकारचे घटक पक्ष नगर शहरात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. काल मनपा आयुक्तांनी 20 लसीकरण उपकेंद्रे जाहीर केली आहेत. ती सर्व राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व नेत्यांशी संबंधित असून शिवसेनेला लसीकरण उपकेंद्रे देताना डावलण्यात आल्याबद्दल आज आयुक्त गोरे यांना शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी घेराव घालून जाब विचारला. तसेच आम्हाला लस विकत द्या,आम्ही नागरिकांना मोफत लस देऊ अशी मागणी यावेळी शिवसेना नगरसेवकांनी केली. आयुक्तांनी यासंदर्भात सर्व पक्षाच्या गटनेत्यांना बोलवुन बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा झाल्यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.


नगर शहरातील लसीकरणाबाबतचा गोंधळ रोजच वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचे किरण काळे, शिवसेनेचे बाळासाहेब बोराटे व आ. संग्राम जगताप समर्थकांमध्ये वाद झाल्यानंतर आरोप-प्रत्यारोप होत असतानाच काल मनपा आयुक्तांनी नवीन 20 लसीकरण उपकेंद्रांची नावे जाहीर केली. या नावांवरून शिवसेनेचे नेते संतप्त झाले आहेत. लसीकरण उपकेंद्र देताना राजकारण झाल्याचा शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्‍यांचा आरोप आहे.

अंकुर लॉन्स (चाणक्य चौक), इंद्रप्रस्थ लॉन्स (सारसनगर), हमाल पंचायत भवन (मार्केट यार्ड), मराठा मंगल कार्यालय (मध्य शहर), सिंधी हॉल (तारकपूर), आम्रपाली गार्डन (गुलमोहर रोड), गंगा लॉन्स (निर्मल नगर), एन एम गार्डन (मुकुंदनगर), निशा लॉन्स (केडगाव), संजोग लॉन्स (मनमाड रोड), बचत भवन (बोल्हेेगाव) ही उपकेंद्रे राष्ट्रवादी नगरसेवकांशी संबंधित असून एस टी महाले मंगल कार्यालय (मध्य शहर), गुरुदत्त लॉन्स (भुतकरवाडी), शिव पवन मंगल कार्यालय (नालेगाव), शुभम मंगल कार्यालय (सावेडी नाका) ही उपकेंद्रे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवकांनी केला आहे. लसीकरण उपकेंद्रांबाबतीत वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, संभाजी कदम, भगवान फुलसौंदर, भाऊ बोरुडे, गणेश कवडे, शाम नळकांडे, संजय शेंडगे, अनिल शिंदे, विजय पठारे, सचिन शिंदे, बाळासाहेब बोराटे, संग्राम कोतकर, संतोष गेनाप्पा, नीलेश भाकरे आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

“केडगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी खाजगी जागेत लसीकरण केले आहे. अशा डॉक्टरांवर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे. - दिलीप सातपुते, शहर प्रमुख शिवसेना.

नगर कल्याण रोड हा परिसर खूप मोठा असून या भागातील अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. या भागात फक्त 2% चं  लसीकरण झाले आहे. या परिसरात लसीकरण उपकेंद्राची आवश्यकता असून बंद करण्यात आलेले लसीकरण उपकेंद्रे पुन्हा चालू करा. - शाम नळकांडे, नगरसेवक

“काल सत्ताधारी पक्षांच्या नगरसेवकांच्या उपकेंद्रांवर जवळजवळ दिडशे ते  दोनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. शिवसेना नगरसेवकांना लसीचे वाटप करताना डावलण्यात येत आहे. लसीच्या वाटपात राजकारण न करता लसीकरणाचे समान वाटप करण्यात यावे. दुजाभाव करण्यात येऊ नये - गणेश कवडे, नगरसेवक शिवसेना.

आम्हास लस विकत द्या, आम्ही नागरिकांना मोफत लस देवू. आम्हास लस विकत मिळाल्यास आम्ही नागरिकांना मोफत लस देऊ - विक्रम राठोड, 


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only