Tuesday, May 4, 2021

सराईत गुन्हेगारास गावठी कटटयासह अटक केली आहे,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी केली

 सराईत गुन्हेगारास गावठी कटटयासह अटक केली आहे,श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी केली आहे.


श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि संजय सानप यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत आरोपी बल्ली उर्फ बलराम रामचित यादव रा. सरस्वती कॉलनी वार्ड नं. ७ श्रीरामपूर हा जबरी चोरी करण्याचे उददेशाने 'हुसैननगर कडुन खबडीकडे जाणारे रोडवर अॅक्टीवा मोटारसायकलवर फिरत आहे. अशी गोपनीय बातमी मिळालेवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व पोलीस अमंदार यांनी त्याचा पाठलाग करुन त्यास शिताफीने पकडले. सदर आरोपीची अंगझडती व अॅक्टीवा गाडीची झडती घेतली असता अॅक्टीवा गाडीचे सीटखाली असलेल्या डिक्कीमध्ये एक गावठी कटटा व एक जिवंत काडतुस असा ६५,०००/- रु पयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे. करीता नमुद आरोपीविरुदध पोकॉ/ १२१० किशोर सुभाष जाधव नेम- श्रीरामपूर शहर पोस्टे यांचे फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि नं. २४८/ २०२१ भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला मा. न्यायालयाने दिनांक ०६/०५/२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली आहे. तसेच पोलीस स्टेशन श्रीरामपूर शहर येथे दाखल असलेल्या एका मोक्का प्रकरणातील आरोपी नईम मेहमुद सय्यद रा. अचानक नगर वार्ड नं. १ श्रीरामपूर याचा तो साथीदार असुन दोन्ही आरोपीतांनी चैनस्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत.


आरोपी बल्ली उर्फ रॉकी उर्फ बलराम रामचित यादव वय २५ वर्ष रा. सरस्वती कॉलनी वार्ड नं. ७ श्रीरामपूर हा सराईत गुन्हेगार असुन त्याचेविरुदध यापुर्वी खालीप्रमाणे गुन्हे दाखल आहेत.


१) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि. नं. ३६१ / २०१८ भादवि कलम ३९२,३४ २) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि. नं. २९९/२०१७ भादवि कलम ३९२,३४


३) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि. नं. २९०/२०१७ भादवि कलम ३७९


४) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि. नं. ३६१ / २०१८ भादवि कलम ३९२,३४ (फरार) ५) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि.नं. १३६ / २०१४ भादवि कलम ३९२,३४


६) शिर्डी पोस्टे गु रजि.नं. १२९/२०१७ भादवि कलम ३९२,३४ ७) तोफखाना पोस्टे गु रजि.नं. ११७/२०१७ भादवि कलम ३९२,३४


८) तोफखाना पोस्टे गु रजि. नं. ५१४ / २० भादवि कलम ३९२,३४ ९) तोफखाना पोस्टे गु रजि.नं. ११४/२०१७ भादवि कलम ३९२,३४


१०) कोपरगाव शहर पोस्टे गु रजि. नं. ३६१/२०१८ भादवि कलम ३९२,३४


११) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि नं. T५५ / २०२० भादवि कलम ३९२,३४ (फरार) १२) श्रीरामपूर शहर पोस्टे गु रजि नं. T६९ / २०२१ भादवि कलम ३९९,४०२ सह आर्मअॅक्ट ४ / २५ (फरार )


सदरची कौतुकास्पद कामगिरी श्री. मनोज पाटील सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर श्रीमती दिपाली काळे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, श्री. संदीप मिटके सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि श्री संजय सानप, पोहेकॉ/ १२०३ जोसेफ साळवी, पोकॉ / १२१० किशोर जाधव, पोकॉ / ६५१ राहुल नरवडे, पोकॉ/ २२७० पंकज गोसावी, पोकॉ / ९८४ राहुल गायकवाड, पोना १४५२

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only