Saturday, May 8, 2021

डीआरडीओ’च्या कोरोना प्रतिबंधक ‘2-DG’औषधाला DCGI ची मंजुरी; ऑक्सिजनची गरज कमी होणार

 डीआरडीओ’च्या कोरोना प्रतिबंधक ‘2-DG’औषधाला DCGI ची मंजुरी; ऑक्सिजनची गरज कमी होणारवाढत्या कोरोनाच्या प्रकोपादरम्यान आणि ऑक्सिजनच्या संकटादरम्यान एक दिलासादायक बातमी आली आहे. ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (DCGI) कोरोनावर उपचार म्हणून आणखी एका औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलायड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युअर बायोलॉजीने (CCMB) संयुक्तपणे बनवले आहे. या औषधाचे नाव 2-deoxy-D-glucose (2-DG) असे ठेवण्यात आले आहे. हे औषध तयार करण्याची जबाबदारी हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेट्रीजला देण्यात आली आहे.


‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, 2-deoxy-D-glucose (2-DG) या औषधाचे क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. ज्या रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली ते रुग्ण वेगाने बरे होताना दिसले. तसेच रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबवित्वही कमी झाले. तसेच या औषधाच्या वापरामुळे कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येत आहे. अर्थात हे रुग्ण लवकर बरे होत आहेत.


        

डीआरडीओच्या संशोधकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधाची चाचणी सुरु केली होती. चाचणीमध्ये हे औषध कोरोना विषाणूला रोखण्यास यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. याच आधारावर ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (DCGI) मे 2020 मध्ये या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलची मंजुरी दिली होती. आता हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्येही यशस्वी असल्याचे सिद्ध झाले असून DCGI ने कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून याच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only