Monday, May 10, 2021

दोन तडीपार सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी कट्टा व एक तलवार जप्त तसेच दोन चोरीच्या मोटार सायकल जप्त श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

 
 तडीपार सराईत गुन्हेगाराकडून एक गावठी कट्टा व एक तलवार जप्त

तसेच दोन चोरीच्या मोटार सायकल जप्त श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री संजय सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, तडीपार आरोपी नामे आनंदा यशवंत काळे हा होंडा डिओ मोटार सायकलवर त्याचे दोन साथीदारासह पिस्टल बाळगुन एम. आय. डी. सी. परिसरात फिरत आहे. वरुन पोलीसांनी आनंदा यशवंत काळे वय ३९ वर्ष रा. सुतगिरणी परिसर श्रीरामपूर व त्याचा साथीदार सनी विजय भोसले वय २३ वर्ष रा. दत्तनगर श्रीरामपूर यांना होंडा डिओ मोटार सायकलवर एम. आय. डी. सी. ते रेणूकानगर कडे जाणारे रोडवर जातांना पकडले व त्यांचा एक साथीदार घटनास्थळावरुन पळून गेला. पळून गेलेल्या साथीदाराचे नांव अमित प्रभाकर कुमावत वय-३० वर्ष रा.गौरव रिसिडेन्सी प्लॅट नंबर १ बोरावकेनगर वार्ड नं. ७ श्रीरामपूर असे असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. उपरोक्त आरोपीतांचे होंडा डिओ गाडी नं. एम. एच. १६. सी. एल. ०२०५ चे डिक्की मध्ये असलेले एक गावठी कट्टा व त्याचे मॅग्जिनमध्ये एक जिवंत काडतुस असे एकूण ६५,०००/-रुपयचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केले आहे. पोकों/सुनिल साहेबराव दिघे यांनी दिलेल्या खबर वरुन नमूद तिन्ही आरोपीतांन विरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम ३,५,७/२५, भा.द.वि. कलम ३४, म.पो. का. क १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


तडीपार आरोपी नामे आनंदा यशवंत काळे याचे विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला घरफोडी, दरोड्याची तयारी, चोरी, जबरी चोरी वगैरे १२ गुन्हे दाखल आहे. तसेच सनी विजय भोसले वय २३ वर्ष रा. दत्तनगर श्रीरामपूर यांचे विरुध्द श्रीरामपूर शहर पोस्टेला जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.


तसेच आरोपी नामे बल्ली उर्फ बलराम रामचित यादव वय २३ वर्ष रा. सरस्वती कॉलनी वार्ड नं. ७ श्रीरामपूर याने दिनांक २०/११/२०१८ रोजी फिर्यादी नामे विनित गगन नारंग रा. वार्ड नं. १ श्रीरामपूर याची एक सुझुकी एक्सेस स्कुटर व एक मोबाईल तसेच २५००/-रु रोख रक्कम जबरीने चोरुन नेले बाबत दिनांक २१/११/२०२१८ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यातील सुझुकी एक्सेस स्कुटर किमंत ४००००/-रु प्रमाणे जप्त करण्यात आलेली आहे. तसेच नमूद आरोपी याचेकडून दिनांक ०४/०५/२०२१ रोजी एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुस तसेच अॅक्टीवा मोटार सायकल पोलीसांनी जप्त केलेली होती.


तसेच फिर्यादी नामे जाकिर कासम शेख रा. गुलशनगर वार्ड नं. २ श्रीरामपूर याची राहाते घरासमोरुन दिनांक ०६/०५/२०२१ चे रात्री ०९/०० वा.ते दिनांक ०७/०५/२०२१ रोजी पहाटे ०४/०० वा. चे दरम्यान हिरो स्प्लेडर प्लस मोटार सायकल चोरीस गेल्या बाबत दिनांक ०८/०५/२०२१ रोजी गुन्हा दाखल झालेला होता. सदर मोटार सायकल विधी संघर्षित बालक नामे सुनिल दिलीप जावळकर रा.धनगरवस्ती वार्ड नं. २ श्रीरामपूर याचे कडून दिनांक ०८/०५/२०२१ रोजीच त्वरीत जप्त करण्यात आलेली आहे. सदर मोटार सायकल खोललेल्या अवस्थेत मोटार सायकलचे स्पेअर पार्ट मिळून आलेले आहेत.


तसेच तडीपार आरोपी नामे योगेश राजेंद्र काळे वय २७ वर्ष रा.वडाळा महादेव हा दिनांक ०९/०५/२०२१ रोजी दुपारी १२/३० वा.चे दरम्यान वडाळा महादेव एसटी स्टॅन्डजवळ बेकायदेशिर रित्या स्वतःच्या कब्जात एक लोखंडी तलवार बाळगतांना मिळून आल्याने त्याचे विरुध्द भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४/२५ सह म.पो.का.क १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जप्त करण्यात आलेली आहे.


सदरची कामगिरी मा. श्री मनोज पाटील सर पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीमती दिपाली काळे मॅडम अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर, मा. श्री संदिप मिटके सर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग, श्रीरामपूर, यांचे मार्गदर्शना खाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, सहा. पोलीस निरीक्षक संभाजी पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरवडे, पोहेकॉ/ जोसेफ साळवी, पोकॉ/सुनिल दिघे, पोहेकॉ/ आर. ए. खेडकर, पोना/बिरप्पा करमल, पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ पंकज गोसावी, पोना/अमोल जाधव, पोना/संजय दुधाडे, पोकॉ/किरण पवार यांनी केली आहे.
Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only