Monday, May 24, 2021

सराईत गुन्हेगार विजय पठारे जेरबंद तोफखाना पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या सराईत गुन्हेगार विजय पठारे जेरबंद तोफखाना पोलिसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या


नगर दि. २४ प्रतिनिधी

शहरात दहशत निर्माण करून एकावर चाकू हल्ला करणारा सराईत गुन्हेगार विजय राजू पठारे व त्याचा साथीदार करण पाचारणे यांना तोफखाना पोलिसांनी पुण्यातून अटक केली. दरम्यान पठारे यांच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याच्यावर आता पुढील कारवाई करण्याचा प्रस्ताव केला जाणार आहे. गेल्या आठवडाभरात सातत्याने अनेक ठिकाणे बदलत असल्याने तो सापडत नव्हता. मात्र तोफखाना पोलिसांनी त्याला पुण्यातून शोधून काढून आज अटक केली आहे.19 मे रोजी दिनेश पंडीत (रा. सिद्धार्थनगर) व यापूर्वी बालिकाश्रम रोडवरील दोन दुकानात दरोडा टाकून दहशत निर्माण केली होती. विजय पठारे त्याचा साथीदार संतोष नवगिरे, गणेश पठारे तसेच विजय पठारेचा एक अनोळखी मित्र अशा चौघाजणांनी सिद्धार्थ नगर जवळील सुडके मळा परिसरात एकजनाला गंभीर मारहाण करून जखमी केले होते. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पठारे व त्याच्या टोळीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गेल्या महिन्यात नगर शहरातील बालिकाश्रम रस्त्यावर असलेल्या दुकानदारांकडे खंडणीची मागणी करून आरोपी विजय पठारे, अजय पठारे व त्याच्या साथीदारांनी दुकानदारांना मारहाण करत दरोडा टाकला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जेरबंद केले होते. विजय पठारे, अजय पठारे यांच्यासह त्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी अशाच प्रकारचे गंभीर गुन्हे यापूर्वीही केले आहेत. विजय पठारे गँगची दहशत माजवण्याची पद्धत पाहता पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांच्याविरोधात 'मोक्का' अन्वये कारवाई सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाई सुरू आहे.


विजय पठारे पसार होता. यापूर्वी त्याच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु पठारे पोलिसांच्या हाती लागत नव्हता. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासाठी तात्काळ पोलिसांना पथक नेमण्याचे आदेश दिले होते. तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी एक विशेष पथक नियुक्त केले होते. आरोपीचा गेल्या आठ दिवसापासून शोध घेत होते. अखेर उपनिरीक्षक मेढे व त्यांच्या पथकाला पठारे व त्याच्या एका साथीदार पुण्यात असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानुसार त्यांनी काल वाघोली या ठिकाणी सापळा रचून आरोग्य पठार याला अटक केली.


तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे , पोलीस शकील सय्यद ,अविनाश वाकचौरे,वशीम पठाण, अहमद इनामदार ,सचिन जगताप, धीरज खंडागळे, तसेच मोबाईल सेलचे प्रशांत राठोड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहेचौकट


आरोपी विजय पठारे यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांमध्ये दहा गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, जीवे मारण्याचा प्रयत्न यासह विविध प्रकारचे गुन्हे त्याच्यावर दाखल असून, त्याच्यावर  पुढील कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती नगर शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक  विशाल ढुमे यांनी दिली.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only