Saturday, May 8, 2021

बाभुळवाडे येथे तलावाचे मजबुतीकरण कामाचा शुभारंभ आ.निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न !
 *बाभुळवाडे येथे तलावाचे मजबुतीकरण कामाचा शुभारंभ आ.निलेश लंके यांच्या हस्ते संपन्न !*


पारनेर प्रतिनिधी : श्रीकांत चौरे

         कोरोना महामारीचा सामना करत आसताना या जैविक युद्धात सध्या महाराष्ट्रात चर्चेत असनारे एकमेव आमदार निलेशजी लंके यांनी एक योद्धा बनुन जनतेची सेवा करत आहे. त्याच बरोबर मतदार संघातील विकास कामांकडेही दुर्लक्ष होऊ देत नाही .

       शुक्रवार दि. ७ मे रोजी बाभुळवाडे येथील खनकर दरा तलावाच्या मजबुतीकरण व गळती काढण्याच्या कामाचा शुभारंभ पारनेर चे लोकप्रिय आमदार श्री निलेश लंके व पुणे येथील खाजगी व शासकीय बांधकाम क्षेत्रात नावाजलेली कंत्राटदार कंपनी VMMIIPL(व्ही.एम. मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर्स इंडिया प्रा.लि.) चे संचालक श्री. श्रीकांत मातेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आपलं गाव फाउंडेशन च्या कार्यालयात श्री श्रीकांत मातेरे यांचे शाल व श्रीफळ देऊन आमदार साहेबांनी स्वागत केले. तसेच फाउंडेशन चे विश्वस्त श्री संजय शिर्के यांनी VMMIIPL च्या सीएसआर फंडातून होत असलेल्या कामांची व फाउंडेशन च्या कामांची माहिती दिली. या प्रसंगी आमदारांनी VMMIIPL व आपलं गाव फाउंडेशन द्वारे होत असलेल्या या कामाचे कौतुक केले. या कामामुळे तलावाची खूप मोठ्या प्रमाणात होणारी गळती कमी होणार आहे. तसेच खनकर दरा तलाव ते खाली घाटशिळ्या पर्यंतच्या ओढ्यालगतच्या जवळपास ५० विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास देखील मदत होणार आहे. गावकऱ्यांचा चांगला सक्रिय सहभाग मिळाल्यास VMMIIPL चा सी. एस. आर. च्या माध्यमातून भविष्यात देखील विविध लोकोपयोगी कामे करण्याचा मानस आहे. या प्रसंगी सरपंच देवेंद्र जगदाळे, राष्ट्रवादी चे माहिती तंत्रज्ञान प्रमुख जितेश सरडे, हेमंत हांडे, उपसरपंच बाळू नवले, ग्रा.पं. सदस्य प्रमोद खनकर, फाउंडेशन चे अध्यक्ष सुरेश खनकर, सचिव प्रमोद जगदाळे, उपाध्यक्ष सुनील पोटे, खजिनदार शिर्के सर, विश्वस्त कैलास खोडदे, सदस्य साहेबराव चौधरी गुरुजी, संतोष बोरुडे गुरुजी, जुम्मा पठाण, ईश्वर क्षीरसागर, संतोष खणकर, सरवार पठाण, संतोष जगदाळे, दत्तात्रय जगदाळे, सुधाकर जगदाळे, प्रशांत जगदाळे, संदीप चिकणे, संजय चिकणे, दिगंबर जगदाळे, शामभाई पठाण, सागर जगदाळे, विनोद मंडले व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only