Thursday, May 27, 2021

सावेडीत बिल्डींग मटेरिअच्या सामानाची चोरी करणारे चोरटे जेरबंद तोफखाना पोलीसांकडुन 24 तासाच्या आत आरोपींना बेड्यासावेडीत बिल्डींग मटेरिअच्या सामानाची चोरी करणारे चोरटे जेरबंद 

 तोफखाना पोलीसांकडुन 24 तासाच्या आत आरोपींना बेड्या 


अहमदनगर -  सावेडीत बिल्डींग मटेरिअच्या सामानचे दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून लाखों किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर आरोपीना  तोफखाना पोलीसांकडुन 24 तासाच्या आत अटक करण्यात यश आले आहे. 


 संदीप उर्फ संजु रामचंद्र गायकवाड, मंगेश उर्फ अंकल संजु पवार, शर्मा हुरमास काळे, (सर्व रा नोबेल हॉस्पिटल मागे , प्रेमदान हाडको , सावेडी),  राम सुदाम सौदागर(रा.वैदुवाडी भिस्तबाग चौक) अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहे.  तर त्याच्या सोबत चोरी करणारे साथीदार परम्या गायकवाड, लक्ष्मण कु - हाडे, आकश कु - हाडे याचा पोलीस कासून शोध घेत आहे. 


याबाबत पोलिसांनी दिलेली महिती अशी की,अज्ञात चोरट्यांनी सिरॅमिक्स बिल्डींग मटेरिअल सप्लायर्स दुकान , पंचशिल हॉटेल , सावेडी अहमदनगर येथुन बिल्डींग मटेरिअल सामानाची चोरी करून दुकाने फोडले होते. या बाबत घरफोडीचा गुन्हा दाखल झालेला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर  उपविभागीय अधिकारी विशाल दुमे , पोलीस निरीक्षक एस.पी गायकवाड , यांचे मार्गदर्शनाखाली सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे , पोहेकाँ । शकील सय्यद , पोना / अविनाश वाकचौरे , पोना / वसीमखान पठाण , पोना / अहमद इनामदार , पोकॉ / धिरज खंडागळे , पोका / सचिन जगताप , पोकॉ / गोमसाळे , पोकॉ / आंधळे , यांनी या गुन्हचा तपास केला. या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाळी की सदर गुन्ह्यातील आरोपी हे प्रेमदान हाडको , झोपडपटटी , अहमदनगर येथे आले असल्याची माहीती मिळाल्याने सदर भागात वेगवेगळ्या ठिकाणी सापळा लावुन आरोपीना जेरबंद केले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only