Monday, May 31, 2021

आरक्षणाबाबत आघाडी सरकार एका सुरात बोलत नाही विखेंचा आरोपदि.३१ प्रतिनिधी 

 आरक्षणाच्या संदर्भात आघाडी सरकार एका सुरात बोलत नाही.मंत्र्यांची विधानच विसंगती निर्माण करीत असल्याने  मराठा समाजाला आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता नसल्याचा थेट आरोप भाजपाचे जेष्ठ नेते आ राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.


पाथर्डी येथे  आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजील प्रतिनिधीशी आ.विखे यांनी संवाद साधून भविष्यात या न्याय मागणीसाठी पुढे कसे जाता येईल याबाबतची मत त्यांनी जाणून घेतली.आ.मोनिका राजळे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे अभय आव्हाड काशिनाथ लंवाडे तालुका अध्यक्ष माणिकराव खेडकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.


मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या  निकालातील बारकावे आ.विखे पाटील यांनी उपस्थितांना समजूत सांगत आघाडी सरकारने आरक्षण देण्यात कसा घोळ घातला याची जाणीव करून दिली.त्यातच मागासवर्गीय आयोगाकडे आलेलया हरकतीचे भाषांतर सुध्दा आघाडी सरकार करून देवू शकले नाही यावरूनच सरकारची उदासिनता स्पष्ट होत असल्याकडे त्यांनी उपस्थित प्रतिनीधीनीचे लक्ष वेधले.


आ.मोनिका राजळे यांनी मराठा समाजाने यापूर्वी आपल्या मागणीसाठी शांततेने आंदोलन केली.भाजप सरकारने आरक्षण दिल्याने समाजील तरूणांना संधी  मिळाल्या.पण आज मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे प्रश्न निर्माण झाल्याने समाजातील तरुणांचे भवितव्य अंधारात गेले आहे.येणाऱ्या काळात समाज जी भूमिका घेईल त्याबरोबर राहू आशी ग्वाही त्यांनी दिली.

याप्रसंगी बाबा आमटे,दादा डांगे,विलास खोले,आजीनाथ मोरे परमेश्वर पाकडे,स्वप्नील पाकडेॅ  काशिनाथ लंवाडे यांनी मराठा आंदोलनाबाबत आपली मनोगत व्यक्त केली.याप्रसंगी अजय रक्ताटे बंडूशेठ बोरुडे प्रतिक खेडकर संभाजी वाघ विष्णूपंत अकोलकर बापुसाहेब पाटेकर आदींसह मराठा संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only