Saturday, May 29, 2021

त्यावेळेला महाविकास आघाडी नसल्याने राष्ट्रवादीची साथ घेतली - खासदार सुजय विखेंची कबुलीनगर दिनांक 29 प्रतिनिधी


राज्यात आमचे संख्याबळ नाही तशीच अवस्था नगरच्या महानगरपालिकेमध्ये आहे. त्यामुळे महापौर पदाच्या निवडणुकीसाठी आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही, असे वक्तव्य भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केले. गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे सहाय्य आम्ही घेतले तेव्हा राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात नव्हते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.


खासदार सुजय विखे म्हणाले, नगरच्या महानगरपालिकेच्या महापौरपदाची निवडणूक होत आहे. राज्यामध्ये जसे आमचे संख्या बळ नाही तसेच महानगरपालिकेमध्ये पण नाही व आमच्याकडे उमेदवार पण नाही. त्यामुळे आम्ही महापौरपदावर दावा करण्याचे काहीच कारण नाही. राष्ट्रवादीची साथ त्यावेळेला घेतली होती ही वस्तुस्थिती आहे, कारण त्या वेळेला राज्यामध्ये महाविकासआघाडी नव्हती. आता राजकीय समीकरणेही बदलली आहेत. राज्यात महाविकास आघाडी सरकार आलेले आहे. जसे मुख्यमंत्री होताना त्यांनी जसा निकष लावला होता, तसाच निकष ते इथे सुद्धा लावतील, अशी अपेक्षा आहे, असेही खासदार सुजय विखे यांनी यावेळी सांगितले.


कोरोना सेंटरमध्ये काही जण वेगवेगळ्या प्रकारच्या डान्सचा आस्वाद घेत आहे. ही नवीन पद्धत मला आज भावली गेले आहे, असा टोलाही कोणाही लोकप्रतिनिधींचे नाव न घेता त्यांनी यावेळी लगावला.


लसीकरण मोहीम सगळ्या ठिकाणी राबवली गेली पाहिजे असे आम्ही येथील प्रशासनाला सांगितले आहे. काल शहरातील लसीकरण केंद्रांची जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये आता नव्याने बदल करण्यास सुद्धा सांगितले आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभागांमध्ये मंगल कार्यालय निश्चित करण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी उपकेंद्र तात्काळ सुरू केले जातील. लस उपलब्ध झाल्यानंतर नागरिकांना तात्काळ दिली जाईल, असा निर्णय बैठकीत झाला असल्याचे खासदार सुजय विखे यांनी यावेळी सांगितले.


नगर जिल्ह्यामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत गेलेली होती. अनेक रुग्ण यामध्ये दगावले हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. या मृत्यूचा आकडा सुद्धा मोठा आहे. येथील प्रशासनाने कोरोनाच्या काळामध्ये काम केले आहे, ते अतिशय योग्य पद्धतीने केलेले आहे. कोणालाही नाव ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही, असेही खासदार सुजय विखे यांनी सांगितले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only