Saturday, May 8, 2021

वांबोरीत दीड कोटीचा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार

 
वांबोरीत दीड कोटीचा ऑक्सिजन प्लांट सुरू होणार


। नगर । दि.09 मे । कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून अत्यवस्थ होणार्‍या रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. या पार्श्‍वभूमीवर वांबोरी येथे सुमारे 1 कोटी 53 लाख रुपयांचा ऑक्सिजन प्लांट तातडीने उभारण्यात येणार आहे. तसेच 70 खाटांचे ऑक्सिजन सेंटरही याठिकाणी सुरू केले जाईल, अशी माहिती प्रांताधिकारी दयानंद जगताप तसेच तहसीलदार एफ. आर. शेख यांनी वांबोरीत दिली.

कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण रूग्णालयात दररोज तपासणीसाठी तसेच लसीकरणासाठी मोठी गर्दी होत आहे. गावातच महेश मुनोत विद्यालयात संस्थात्मक विलगीकरण केंद्राचीही व्यवस्था करण्यात आली. परंतु, जे रुग्ण अत्यवस्थ होतात, त्यांना ऑक्सिजन खाटा मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. या पार्श्‍वभूमीवर ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस ऑक्सिजन प्लांट उभारणीचे नियोजन आहे.

प्रांताधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार एफ. आर. शेख यांनी शुक्रवारी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जागेची पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भिटे, तलाठी सतीश पाडळकर, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गागरे, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत डॉ. पाठक, डॉ. भारती पेचे आदी उपस्थित होते. कोविन अ‍ॅपवर ऑनलाइन नोंदणीचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. दरम्यान, लसीकरणासाठी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाल्याने अधिकारीही आवाक झाले. यावेळी काही ग्रामस्थांनी तहसीलदारांना भेटून त्यांची व्यथा मांडली.

तसहीलदार शेख म्हणाले, वांबोरी येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणीचे नियोजन आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठीची तयारी सुरू आहे. त्यासाठी हा प्लांट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्लांटसाठी 1 कोटी 53 लाख रुपये खर्च येणार असून 5 जूनपर्यंत हा प्लँट उभारणीचे नियोजन आहे. कार्यारंभ आदेश येताच कामाला तातडीने सुरुवात होईल. ऑक्सिजन प्लांट बरोबरच याठिकाणी सुमारे 70 खाटांचे ऑक्सिजन सुविधायुक्त कोविड सेंटरही उभारण्यात येईल, असे सांगितले.

वांबोरीतील ऑक्सिजन बेड तुर्तास बंद

वांबोरीसह पंचक्रोशीतील कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास उपचारासाठी वांबोरी ग्रामीण रुग्णालयात सुमारे 20 खाटा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. परंतु, वांबोरीच्या ऑक्सिजन खाटा आता राहुरीला शिफ्ट करून तेथे सुमारे 100 खाटांचे ऑक्सिजनयुक्त सेंटर उभारण्यात आले. वांबोरीतील सुविधा राहुरीत शिफ्ट केल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी निर्माण झाली. तुर्तास वांबोरी ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन सुविधा बंद झाली.

तसहीलदार शेख म्हणाले, वांबोरी येथे तातडीने ऑक्सिजन प्लांट उभारणीचे नियोजन आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठीची तयारी सुरू आहे. त्यासाठी हा प्लांट महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या प्लांटसाठी 1 कोटी 53 लाख रुपये खर्च येणार असून 5 जूनपर्यंत हा प्लँट उभारणीचे नियोजन आहे. कार्यारंभ आदेश येताच कामाला तातडीने सुरुवात होईल. ऑक्सिजन प्लांट बरोबरच याठिकाणी सुमारे 70 खाटांचे ऑक्सिजन सुविधायुक्त कोविड सेंटरही उभारण्यात येईल, असे सांगितले.

जगताप म्हणाले, ऑक्सिजन प्लांट हा टीएसए पद्धतीचा असून हवेतून ऑक्सिजन निर्मिती केली जाईल. दररोज या ठिकाणी सुमारे 115 सिलिंडर ऑक्सिजन उपलब्ध होईल. 40 बाय 30 मीटर जागेत ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरची उभारणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भिटे म्हणाले, आपण यापूर्वी रुग्णालयात ऑक्सिजन खाटांची व्यवस्था करण्याची मागणी केली होती. आता लवकरच याठिकाणी ऑक्सिजन प्लांट व कोविड सेंटर उभारण्यात येणार असल्याने रुग्णांचीही सोय होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, दररोज कोणत्या वयोगटासाठी लस देणार व किती लस आहेत, याचा गोषवारा फलकावर ठळक लिहिण्याचे आदेश तहसीलदारांनी रुग्णालय व्यवस्थापनाला दिल्या आहेत.

रुग्णालयातील गर्दी पाहून अधिकारीही झाले चकीत, पथकाकडून जागेची पाहणी

लसीकरणाचा गोंधळ सुरूच

वांबोरीत मार्चच्या दुसर्‍या आठवड्यापासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीचे काही दिवस कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही प्रकारच्या लस उपलब्ध झाल्या होत्या. परंतु, सध्या केवळ कोविशिल्ड लसच उपलब्ध होत आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या दुसरा डोससाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय झाली आहे. गर्दीचे कोणतेही नियोजन नाही. सकाळपासून रांगेत थांबलेल्या नागरिकांनी अधिकार्‍यांसमोर संताप व्यक्त केला. दोन ते तीन दिवस खेटा घातल्यानंतरही लस घेण्यासाठी ताटकळत थांबावे लागत आहे. 100 लसचे डोस उपलब्ध असताना बाहेर मात्र, दोनशे ते तीनशे नागरिक लस घेण्यासाठी आल्याने अनेकांना लस मिळत नाही.

वांबोरी गावात सध्या 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

वांबोरी येथे आतापर्यंत 727 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 605 रुग्ण उपचार घेऊ

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only