Monday, May 17, 2021

तर भाजीपाला आणि किराणा मालासाठी महापालिकेत आंदोलन करु! नगरच्या माळीवाड्यातल्या स्थानिक नागरिकांचा महापालिका प्रशासनाला इशारा!
 तर भाजीपाला आणि किराणा मालासाठी महापालिकेत आंदोलन करु! नगरच्या माळीवाड्यातल्या स्थानिक नागरिकांचा महापालिका प्रशासनाला इशारा!। नगर । दि.17 मे । कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगरमध्ये गेल्या 45 दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या लॉकडाऊनमुळे नागरिकांना 10 रुपयांच्या कोथिंबिरीची एक जुडी तब्बल 30 रुपयांना विकत घ्यावी लागत आहे.

यासाठी अहमदनगर महानगरपालिकेने स्थानिक नागरिकांना किराणा आणि भाजीपाला घरपोहोच देण्याची व्यवस्था करावी.अन्यथा कोरोनाच्या नियमांचे पालन करुन जसे, की सॅनिटायझर, मास्क वापरुन आणि सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून नागरिक किराणा आणि भाजीपाल्याच्या खरेदीसाठी स्थानिक नागरिक किराणा आणि भाजीपाल्याच्या खरेदीसाठी स्थानिक नागरिक महापालिकेच्या आवारात गर्दी करतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय.


यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या पत्रात म्हटलं आहे, की लॉकडाऊनमुळे घराबाहेर जाता येत नाही. दारावर जे विक्रेते येताहेत, भाजीविक्रेते येत आहेत, ते चढ्या भावाने भाज्यांची विक्री करताहेत. किराणा मालाचीही तीच परिस्थिती असून नागरिकांना काळ्या बाजाराने किराणा विकत घ्यावा लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊन संदर्भात अहमदनगर महानगरपालिकेने जे सुधारित आदेश दिले आहेत, त्याविषयी फेरविचार करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only