Wednesday, May 26, 2021

कुख्यात गुंड विजय पठारे व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करानगर दि 26 प्रतिनिधी


 शहरात लुटमार, दरोडे आणि मारहाण करणारा कुख्यात गुंड विजय उर्फ राजू पठारे याच्या तोफखाना पोलिसांनी मुसक्या आवळ्याल्नंतर आता याला व त्याच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करुन कायमस्वरूपी हद्दपार करण्याची मागणी सिद्धार्थनगर येथील नागरिक व महिलांनी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली.


अनेक गुन्ह्यामध्ये पठारे हा फरार होत

तोफखाना पोलिसांनी त्याला व त्याच्या साथीदाराला पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून दोन दिवसांपूर्वी अटक केलेली होती त्याला अटक झाल्यानंतर सिद्धार्थनगर येथील नागरिकांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पुढील कारवाईची मागणी केली आहे यावेळी राणीताई दाभाडे, सुनिता साळवे, रेणुका मिसाळ, बिपाशा कांबळे, राधिका पंडित आदी नागरिक उपस्थित होते. 


कुख्यात गुंड विजय उर्फ राजू पठारे (रा. सिध्दार्थनगर) हा तडीपार असून देखील शहरांमध्ये खुलेआम वावरत होता. 

त्याच्यावर तोफखाना, कोतवाली व एमआयडिसी पोलीस स्टेशनमध्ये लुटमार, दरोडे, खंडणी, मारहाण आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शहरात त्याने पुणे, मुंबई सारखी गुंडांची टोळी बनवून दहशत माजवली आहे.


19 मे रोजी त्याने दिनेश पंडीत नामक व्यक्तीवर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने जीवघेणा हल्ला केला होता. तोफखाना पोलीस स्टेशनला 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पठारे यांने काही गुंडांनी हाताशी धरुन शहरात व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करुन हप्ते गोळा करण्याचे काम सुरु आहे.
 

त्याचे गांजा, हातभट्टी व दारू विक्रीसह बंदूक, तलवार यांसारखे शस्त्र विक्रीचे अवैध व्यवसाय सुरु आहेत. सदर गुंड पठारे व त्यांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई न झाल्यास पुन्हा ते शहरात दहशत माजवून सर्वसामान्यांना त्रास देणार आहे.


यामुळे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे घडून शहराची शांतता व कायदा सुव्यवस्था भंग करण्याचे काम होणार आहे.
 

अशा गुंडांना वेळीच आवर घालण्यासाठी त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करुन कायमस्वरूपी हद्दपारीची कारवाई करण्याची मागणी सिध्दार्थनगरच्या नागरिकांनी केली आहे. निवेदनावर सत्तर ते ऐंशी नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only