Monday, May 17, 2021

नगर शहरातील अत्यावश्यक सेवा पूर्ववत करावी

 नगर दि 17  प्रतिनिधी


नगर महानगरपालिका आयुक्त यांनी  दिनांक १५/०५/२०२१ रोजी नगर शहरातील घाऊक व किरकोळ किराणा मुसार व्यापार करण्याकरिता परवानगी दिली व त्यानुसार शहरातील व्यापार सुरू झाला. परंतु दिनांक आज  रोजी संध्याकाळी त्यांनी नवीन अद्यादेश काढून दिनांक 17 पासून सर्व व्यापार बंद केला आहे तो सुरु करावा अशी मागणी नगर आडते बाजार असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनामध्ये केलेले आहे. बाजारपेठ उघडल्यामुळे व्यापा-यांनी परराज्यातून मालाची खरेदी केली. तसेच शेतकऱ्यांनी गाड्या भरून माल विक्रीकरिता नगर शहरात पाठविला आहे. येणारा माल नाशवंत व जीवनावश्यक असून तो उतरवून घेणे फार आवश्यक आहे. कारण लॉकडाऊन दिनांक १/०६/२०२१ रोजीपर्यंत राहणार असल्याचे अद्यादेशाद्वारे समजते व इतर दिवस माल वहानामध्ये ठेवणे किंवा इतके दिवस ट्रक थांबवून घेणे शक्यच होणार नाही. सदर माल व्यापाऱ्यांना उतरवून घेणे फार गरजेचे आहे. त्यामुळे आपणास नम्र विनंती करण्यात येते की, माल उतरवून घेण्याकरिता दुकान उघडण्याची परवानगी व्यापाऱ्यांना द्यावी. नवीन शेती मालाची आवक सुरू असल्याने परराज्यातून व महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातून नगरला माल विक्रीस येतो बरयाचशा शेतकन्यांनी मालाच्या गाड्या भरलेल्या आहेत. आपण परवानगी दिल्यास शेतकरी त्याचे होणाऱ्या नुकसाणीपासून वाचणार आहे. व्यापारी व शेतकरी यांचे होणाऱ्या नुकसाणीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक विचार करून आलेला माल उतरवून घेण्यात व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी, त्याचप्रमाणे नगर शहर विभागामध्ये कोरोना पॉजीटीव्ह बऱ्याच मोठ्याप्रमाणात कमी झालेले आहेत. त्यामुळे नगर शहरातील अत्यावश्यक सेवेतील किराणा व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. नगर जिल्ह्यातील ज्या गावामध्ये रुग्ण जास्त असतील तेथे लॉकडाऊन करणे हे क्रमप्राप्त आहे. जिल्ह्यातील सर्व गावांची परिस्थिती पहाता नगर शहराची परिस्थिती फार चांगली आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अहमदनगर शहरामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून घाऊक व किरकोळ किराणा मुसार व्यापार चालू करण्यास परवानगी द्यावी, असे अडते बाजार समितीच्या सचिव संतोष बोरा यांनी निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only