Thursday, May 27, 2021

अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे बाजारपेठा सुरू करण्याबाबत आ.संग्राम जगताप यांना निवेदन एक तारखेला बाजारपेठा सुरू करण्यास आ.संग्राम जगताप यांचा पाठिंबा
अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनचे बाजारपेठा सुरू करण्याबाबत आ.संग्राम जगताप यांना निवेदन


एक तारखेला बाजारपेठा सुरू करण्यास आ.संग्राम जगताप यांचा पाठिंबा


अहमदनगर प्रतिनिधी- कोरोना संसर्ग विषाणूंचा प्रादुर्भाव नगर जिल्ह्यात सह शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढत होता याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी लॉकडाऊन चा निर्णय जाहीर केला. गेल्या दोन महिन्यापासून जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शासनाच्या नियमाचे पालन करून सहकार्य केले त्यामुळे शहरातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी झाली आहे.परंतु तालुकास्तरावर सर्व बाजारपेठा सुरू असल्यामुळे तेथील रुग्ण संख्या वाढत आहे. ज्याठिकाणी रुग्ण संख्या जास्त आहे तेथील व्यवहार बंद असणे गरजेचे आहे,परंतु तसे न होता शहरातील रुग्णसंख्या कमी असतानाही जीवनावश्यक वस्तूंचा व्यापार बंद करण्यात आलेला आहे. प्रशासनाला सहकार्य करणे ही प्रामाणिक भावना ठेवून शहरातील जीवनावश्यक वस्तूंच्या व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवून प्रशासनास सहकार्य केले आहे.शहराची बाजारपेठ बंद असल्याकारणाने तालुक्यातील बाजारपेठा मोठी होण्यासाठी मदत होत आहे.तसेच नगर शहराची बाजारपेठ कायमची बंद होण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे,व्यापाऱ्यांना शासनाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक स्वरूपाचे सरकारी पॅकेज जाहीर झाले नाही व ते व्यापाऱ्यांना मिळाले देखील नाही तसेच मालमत्ता कर,विजबिल,जीएसटी,सरकारी करा बाबत कोणत्याही सवलतीचा निर्णय शासनाच्या वतीने घेण्यात आलेला नाही. दुकानातील नोकरांचा पगार, दुकान भाडे,स्वतःचा खर्च,औषध उपचार खर्च, व्यवसायिक कर्जाचे व्याज,मालाचे होणारे नुकसान यामध्ये व्यापारी भरडून निघत आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे अन्यथा व्यापारी दि.१जून रोजी कोरोना संदर्भात सर्व नियमांचे पालन करून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत दुकान उघडण्याचा निर्णय अहमदनगर आडते बाजार व्यापारी असोसिएशनने घेतला आहे या निवेदनाला उत्तर देताना आ.संग्राम जगताप म्हणाले की, व्यापाऱ्यांन बरोबर मी असून एक जूनला बाजारपेठ सुरू करण्यास माझा पाठिंबा राहील असे मत आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. यावेळी अहमदनगर आडते बाजार व्यापारी मर्चंट असोसिएशनच्या वतीने आ.संग्राम जगताप यांना निवेदन देतांना उपाध्यक्ष राजेंद्र बोथरा,सेक्रेटरी संतोष बोरा,प्रशांत मुथा,सचिन कटारिया आदी उपस्थित होते.Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only