Saturday, May 1, 2021

ब्रेक द चैन बाबतच्या सरकारी आदेशानुसार उद्योगधंदे ठप्प झाल्याने जनसामान्यांना कर्ज हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी...ॲड. विक्रम वाडेकर यांची शासनाकडे मागणी *ब्रेक द चैन बाबतच्या सरकारी आदेशानुसार उद्योगधंदे ठप्प झाल्याने जनसामान्यांना कर्ज हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी...*

*ॲड. विक्रम वाडेकर यांची शासनाकडे मागणी*


महाराष्ट्रात वाढता कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उध्दवजी ठाकरे साहेब यांनी ब्रेक द चैन च्या आदेशानुसार अनेक उद्योगक्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.. त्याद्वारे कोव्हिड चा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्यसरकार करत आहे. परंतु ह्या मध्ये सर्वसामान्य नोकरदार, मजुर, वकिलांसह बंद असलेल्या सर्वच उद्योगक्षेत्रातील अनेक लोक बिकट परिस्थितीचा सामना करत आहेत..

सर्वसामान्य जनता आपल्या दैनंदिन उपलब्धतेसाठी मोबाईल आणि वहान अशा साधणांचा वापर करत असेल आणि त्यांच्या हाताला कामच नसेल तर त्यांनी या उपलब्धतेच्या गरजांसाठी घेतलेले अल्प कर्ज फेडायचे कसे असा सवाल उपस्थित झाला आहे. मोबाईल कंपन्या कर्जहप्ता सुरळीत नसेल तर लगेच मोबाईल लॉक करुन टाकत आहेत. कोव्हिड काळात आरोग्याच्या काळजीने परेशान झालेले सर्वसामान्य नागरीक हॉस्पिटल व मेडिकलचे येणारे बील यामुळे हैराण झालेले आहे...

शेतकरी शेतमजूर यांनी सेवा सोसायटीचे घेतलेले कर्ज भरण्यासाठी, लाईटबील भरण्यासाठी पैसे कुठुन आणायचे हा सवाल सध्या भेडासवत आहे...

त्यासाठी राज्य सरकारने अशा सरकारी निमसरकारी बॅंक वित्तीय संस्था पतसंस्था यांना त्वरीत  सदरच्या घेतलेल्या कर्जाची वसुली त्वरीत न करण्याबाबत आदेश पारित करुन सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी ॲड. विक्रम वाडेकर यांनी केली आहे. अशा कोणत्याही त्रस्त झालेल्या नागरीकांना कर्ज न फेडल्यामुळे नाहक त्रासाला बळी व्हावे लागत असेल आणि त्याद्वारे त्यांना फौजदारी अथवा न्यायालयीन प्रकियेस तोंड द्यावे लागणार असेल तर अशा सर्व नागरीकांची प्रकरणे कोणतीही वकील फी न घेता विनामूल्य लढण्यासाठी तयारी ॲड. विक्रम वाडेकर यांनी दर्शवली असून कर्ज थकबाकी बाबतच्या प्रकारातील गुन्हा नोंद झालेल्या त्रस्त नागरीकांनी ९८२३५७७७२२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ॲड. वाडेकर यांच्या तर्फे करण्यात आले आहे

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only