Friday, May 14, 2021

शहरांमध्ये रुग्ण संख्याही कमी होत चाललेली आहे नगर महानगरपालिकेने नव्याने निर्बंध यामध्ये अनेक सवलती या दिलेल्या आहे महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी त्याबाबतचे आदेश पारित केले

 



नगर दिनांक 15 प्रतिनिधी 

नगर जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्यांची  वाढत चालली असताना दुसरीकडे शहरांमध्ये रुग्ण संख्याही कमी होत चाललेली आहे नगर महानगरपालिकेने नव्याने निर्बंध यामध्ये अनेक सवलती  या दिलेल्या आहे महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी त्याबाबतचे आदेश पारित केले आहे .


गेल्या महिन्याभरापासून नगर शहरामध्ये लॉकडाऊन हे पाळण्यात आले होते मागील महिन्यात मध्ये रुग्ण संख्याही मोठ्या प्रमाणावर मध्ये वाढत चाललेली आहे शहरामध्ये मात्र गेल्या आठवडाभरापासून रुग्ण संख्याही कमी होत गेलेली  आहे त्यामुळे अनेक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय येथील प्रशासनाने घेतलेला होता. त्यानुसार त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले होते आज महानगरपालिकेचे आयुक्त गोरे यांनी नगर शहरामध्ये विविध प्रकारचे निर्बंध हे काही कालावधीसाठी शितील केलेले आहे .


नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी जाणून घ्या कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध

 नगर शहरात सातत्याने कोरोना रुग्ण वाढ कायम असून यामुळे शहरात कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध महापालिकेने एक जूनपर्यंत वाढविले असून वेळेची मर्यादा घालून भाजीपाला, किराणा दुकाने खुली ठेवली आहेत. आयुक्त शंकर गोरे यांनी यासंदर्भात आदेश लागू केला आहे. एक जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.


कोरोना विषाणू नियमाचे उल्लघंन केल्यास प्रथम पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-यावेळेस पाच रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल.



चौकट

आदेशानुसार फक्त खालील गोष्टी सुरु असतील -


वैद्यकीय सेवा आणि औषध दुकाने

अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप

घरपोहोच गॅस वितरण सेवा

सर्व बँका सुरू राहतील.

दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री : सकाळी 7:00 ते 11:00

पशुखाद्य विक्री : सकाळी 7:00 ते 11:00 सुरु राहील.

कृषी विषयक दुकाने (विक्री दुकाने), कृषी सेवा केंद्रे : सकाळी 9.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत आणि पुरवठा वाहतूक सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 सुरु राहील. 

किराणा दुकाने : सकाळी 7:00 ते 11:00 वाजेपर्यंत सुरु राहील. पुरवठा वाहतूक सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 सुरु राहतील.

कोरोना विषाणू नियमाचे उल्लघंन केल्यास प्रथम 10 हजार रुपये दंड अकारला जाईल. दुस-यावेळेस 10 हजार रुपये दंड आकारुन दुकान सील केले जाईल. भाजीपाला व फळे बाजार मालाची खरेदी-विक्री : सकाळी 7:00 ते 11:00 वाजेपर्यंत सुरु राहील. कोरोना विषाणू नियमाचे उल्लंघन केल्यास प्रथम एक हजार रुपये दंड आकारला जाईल. दुस-यावेळेस एक हजार रुपये आकारुन माल  जप्त केला जाईल. कोणत्याही परिस्थितीत भाजी / फ़ळे एका जागेवर लावून विक्रि करता येणार नाही, असे निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. अंडी, मटन, चिकन व मत्स्य खरेदी-विक्री : सकाळी 7:00 ते 11:00 वाजेपर्यंत सुरु राहील. नियमाचे उल्लघंन केल्यास पाच हजार  दंड अकारला जाईल. दुस-यावेळेस तेवढाच दंड  आकारुन माल जप्त करुन दुकान सील केले जाईल.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only