Thursday, May 20, 2021

विनापास प्रवास करणारे कार पोलिसांनी पकडली ; कार चालकाची पोलिसांसोबत हुज्जत
 विनापास प्रवास करणारे कार पोलिसांनी पकडली ; कार चालकाची पोलिसांसोबत हुज्जत


नगर - कोरोच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी ई पासची सुविधा सुरू केली आहे. मात्र नगर शहरामध्ये नियमांचे उल्लंघन करणार्‍याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत असतानाच संबंधित वरिष्ठ अशा अधिकाऱ्यानेच पोलिसांना अरेरावी केल्याप्रकरणी  येथील तोफक पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.


नगर जिल्ह्यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशाने प्रत्येक ठिकाणी तपासणी होईल पोलिसांनी हाती घेतली आहे .


आज पुणे ते औरंगाबाद प्रवास करणारी कार डीएसपी चौकात नगर पोलिसांनी अडवली.  त्यांच्याकडे चौकशी केली असता विना ई पास प्रवास करत असल्याची बाब समोर आली आहे. चालकाला दंड भरण्यास सांगितले असता, त्याने पोलिसांसोबत हुज्जत घातल्याचा प्रकार आज सायंकाळच्या सुमारास डीएसपी चौकामध्ये घडला. कोरोच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहे. जिल्हांतर्गत प्रवासासाठी देतील e पास लागू केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता प्रवास करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला इ पास गरजेचा आहे. कोरोनाच्या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी प्रत्येक महामार्गावर चेकपोस्ट उभारले आहे. तेथे या पासची तपासणी पोलिसांकडून केली जाते. नगर शहरातील डीएसपी चौकामध्ये पुणे ते औरंगाबाद प्रवास करणारी एक कार डीएसपी चौकात आज साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी अडवली. त्या कारमध्ये एकूण पाच प्रवासी असल्याचे समोर आले. तसेच चालकाकडे ई पास देखील नसल्याची बाब समोर आली. पोलिसांनी चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र संबंधित चालकाने पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only