Tuesday, May 25, 2021

पोलिसांनी जाहीर केला हेल्पलाइन नंबरनगर दिनांक 25 प्रतिनिधी 


वैदयकिय क्षेत्रातसेवा देणाऱ्या लोकांना झालेल्या हल्लाची व रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध करतो यापुढे वैदयकिय सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ले झाल्यास व रुग्णालयाची तोडफोड झाल्यास हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. याकरता पोलिस विभागाने हेल्पलाइन नंबर सुद्धा दिला असल्याचे असे नगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात मध्ये म्हणलेले आहे


नगर जिल्हयामध्ये मागील काही महिण्यापासुन कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोना विषाणुने बाधीत झालेले रुग्ण विविध रुग्णांलयात औषधोपचार घेत असुन अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दुरदैवाने काही लोकांना यामध्ये आपले प्राण गमवावे लागले. रुग्ण संख्या कमी व्हावी व जास्तीत जास्त रुग्ण बरे व्हावेत यासाठी वैदयकिय सेवा देणारे डॉक्टर, नर्ससेस व त्यांचा स्टॉफ स्वता:चा जीव धोक्यात घालुन अहोराक्त कार्यरत आहेत.


मागील काही दिवसात अशी रुग्णांची सेवा करणाऱ्या वैदयकिय क्षेत्रातील लोकांवर हल्ले झाले आहेत. वैदयकिय सेवा देणारे सर्वजन रुग्ण बरा होण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत असतात. परंतु काही कारणास्तव त्यांना यश येत नाही. अशा वेळी रुग्णांचे नातेवाईक किंवा रुग्णांचे जवळचे लोक वैदयकिय सेवा देणाऱ्यांना जबाबदार धरुन त्यांचेवर हल्ले व त्यांचे रुग्णांलयाची तोडफोड करतात. मागील काही दिवसापासुन असे हल्ले व रुग्णालयाची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या घटना हया निषेदीय असुन अशा हल्लेखोर लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस दल सक्षम असुन सर्वते कायदेशीर पुरावे जमा करुन अशा हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्नशिल असतील.


पोलीस अधीक्षक कार्यालय, नगर यांचेकडुन असे आवाहन करण्यात येते की, वैदयकिय क्षेत्रात


सेवा देणाऱ्या लोकांना झालेल्या हल्लाची व रुग्णालयाच्या तोडफोडीच्या घटनांचा निषेध करतो यापुढे वैदयकिय सेवा देणाऱ्या लोकांवर हल्ले झाल्यास व रुग्णालयाची तोडफोड झाल्यास हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे.


Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only