Wednesday, May 26, 2021

वरवंडी , ता . राहूरी येथील विवाहीत युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणारे फरार मुख्य आरोपी छकूल्या बोरुडे व त्याचे इतर साथीदार जेरबंद- अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई वरवंडी , ता . राहूरी येथील विवाहीत युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणारे फरार  मुख्य आरोपी छकूल्या बोरुडे व त्याचे इतर साथीदार जेरबंद- अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 


 अहमदनगर - वरवंडी , ता . राहूरी येथील विवाहीत युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणारे फरार 

सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी छकूल्या बोरुडे व त्याचे इतर साथीदार जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

मयत विवाहीत युवक नामे रोहित कचरु लांडगे , वय- २४ वर्षे , रा . वरवंडी , ता . राहूरी याची पत्नी नेहमी माहेरी जात असे व तिस घेण्यासाठी नेहमी छकूल्या बोरुडे , रा . डिग्रस , ता . राहूरी हा जात होता . दि . १५/०४/२०२१ रोजी मयत याची सास बिट्टबाई मारुती शिनगारे व छकूल्या बोरुडे असे मयत याचे पत्नीस आणण्यासाठी वरवंडी येथे गेले होते . त्यावेळी मयत रोहित लांडगे याने त्याची सासू बिट्टबाई मारुती शिनगारे हीस त्याचे पत्नीस घेण्यासाठी नेहमी छकूल्या बोरुडे हाच का येतो ? असे म्हणून पत्नीस माहेरी पाठविण्यास नकार दिला . त्यावेळी छकूल्या बोरुडे याने त्याचे इतर साथीदारांना तेथे बोलावून घेवून रोहित लांडगे यांस मारहाण करुन त्याचे पत्नीस डिग्रस येथे घेवून आले होते . त्यानंतर दि . १६/०४/२०२१ रोजी सकाळी ,रोहित कचर लांडगे याने राहते घरी गळफास घेवून आत्महत्या केली होती . त्याबाबत मयत याची आई फिर्यादी शिवाबाई कचरु लांडगे , वरवंडी , ता . राहूरी यांनी राहूरी पो.स्टे . येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरंन . गुरनं . 1 ३१६/२०२१ , भादवि कलम ३०६ , ३४ प्रमाणे मयताची सासू , पत्नी , छकूल्या बोरुडे व इतराविरुध्द दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्यात मयत याची सासू बिट्टबाई मारुती शिनगारे व पत्नी सौ . शिवानी रोहित लांडगे यांना अटक करण्यात आलेली आहे . तसेच सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी छकूल्या बोरुडे व त्याचे इतर साथीदार हे फरार झाले होते . सदर फरार आरोपीतांचा मा . पोलीस अधीक्षक साो , अहमदनगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्री . अनिल कटके , पोलीस निरीक्षक , स्थानिक गुन्हे शाखा , अहमदनगर हे त्यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने शोध घेत असताना पोनि / अनिल कटके यांनी गोपनिय माहिती मिळाली कि , सदर फरार आरोपी छकूल्या बोरुडे व त्याचे साथीदार हे पाईपलाईन हडको परिसरात आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोसई / गणेश इंगळे , पोहेकॉ / दतात्रय हिंगडे , पोना / संदीप पवार , रवि सोनटक्के , पोना/शंकर चौधरी पोकॉ / मेघराज कोल्हे , योगेश सातपूते , लक्ष्मण खोकले , मच्छिन्द्र बर्डे मपोना / भाग्यश्री भिटे अशांनी मिळून पाईपलाईन हडको परिसरामध्ये जावून मिळालेल्या माहितीवरुन आरोपींचा शोध घेवून आरोपी नामे १ ) छकूल्या उर्फ सतीष रावसाहेब बोरुडे , वय -१ ९ वर्षे , रा . डिग्रस , ता . राहूरी , २ ) मोईन अमीर शेख , वय -३१ वर्षे , रा . सदर , ३ ) सिमा रावसाहेब बोरुडे , रा . सदर यांना ताब्यात घेवून राहूरी पो.स्टे . ला हजर करण्यात आले असून पुढील कार्यवाही राहूरी पो.स्टे . करीत आहेत . सदरची कारवाई मा . श्री . मनोज पाटिल साहेब , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री . सौरभ कुमार अग्रवाल साहेब , अपर पोलीस अधीक्षक , अहमदनगर , श्रीमती दिपाली काळे मॅडम , अपर पोलीस अधीक्षक , श्रीरामपूर व श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , श्रीरामपूर विभाग , अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे .

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only