Thursday, May 27, 2021

खारे कर्जुने येथे मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून राबविला एकलव्‍यांसाठी महाराष्‍ट्रातील पहिली घरकुल योजना -


 


खारे कर्जुने येथे मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे पाटील यांच्‍या संकल्‍पनेतून राबविला एकलव्‍यांसाठी महाराष्‍ट्रातील पहिली घरकुल योजना -


मा.केंद्र सरकारच्‍या योजना शेवटच्‍या घटकांपर्यत पोहविणार – मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे पा.


 


नगर -  एकलव्‍य समाज हा उदर निर्वाह करण्‍यासाठी खारे कर्जुने येथील के के रेंज परिसरामध्‍ये 40 ते 50 वर्षापासून वास्‍तव्‍यास आहे. त्‍यांच्‍याकडे कोणतेही कागदपत्रे नव्‍हते. पहिल्‍यांदा त्‍यांना रेशनकार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड मिळून दिले. त्‍यानंतर एकलव्‍य कुटुंबाला स्‍वत:चे हक्‍काचे घर असावे या उद्देशाने खारे कर्जुने येथे 20 गुंठ्ठे जागा खरेदी केली या ठिकाणी मा.केंद्र सरकारच्‍या पंडित दीनदयाळ उपाध्‍याय योजनेतून 60 घरांचा प्रकल्‍प राबविण्‍यात आला. उर्वरित 15 घरांचा प्रकल्‍पही लवकरच मार्गी लावू या कामासाठी मा.श्री.कैलास लांडे, खरेदी विक्री संघाचे संचालक मा.श्री.अंबादास शेळके, माजी सरपंच मा.श्री.सबाजी पानसंबळ यांनी या कामासाठी माझ्याकडे पाठपुरावा केल्‍यामुळे या घरकुल योजनेला यश मिळाले आहे. मा.केंद्र सरकारच्‍या विविध योजना शेवटच्‍या घटका पर्यत घेवून जाण्‍यासाठी मी कटीबध्‍द आहे. कोरोनाच्‍या संकट काळामध्‍ये केंद्र सरकारने महत्‍वाची भुमिका पार पाडली असल्‍याचे प्रतिपादन खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. यांनी केले.


      नगर तालुक्‍यातील खारे कर्जुने येथे खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. यांच्‍या संकल्‍पनेतून राबविण्‍यात आलेल्‍या एकलव्‍य समाजासाठी पूर्ण झालेल्‍या घरकुल योजनेची पाहणी करण्‍यात आली यावेळी जिल्‍हापरिषदेचे उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी श्री.जगन्‍नाथ भोर, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.सचिन घाडगे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्री.अंबादास शेळके, श्री.कैलास लांडे, माजी सरपंच श्री.सबाजी पानसंबळ, श्री.अजित तांबे, श्री.अमोल निमसे, श्री.रसिद सय्यद, श्री.लहानू बोरूडे, श्री. अनिल निमसे, श्री.रामेश्‍वर निमसे, श्री.विजय लांडगे, श्री.भाऊसाहेब काळे, ग्राम‍सेविका श्रीमती प्रियंका भोर आदी उपस्थित होते.


      मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. पुढे म्‍हणाले की, एकलव्‍य समाजाला मुख्‍य प्रवाहात आणण्‍यासाठी प्रयत्‍न केले जात आहेत. लवकरच यांच्‍या मुलांच्‍या शिक्षणासाठी डीजीटल अंगणवाडी सुरू करण्‍यात येईल. पाण्‍याची टाकी, धोबी घाट, सभा मंडप, आदीसह योजना पुढील काळात राबवू असे ते म्‍हणाले.


      श्री.कैलास लांडे म्‍हणाले की, एकलव्‍यासाठी राबविण्‍यात येणा-या घरकुल योजनेमध्‍ये विविध अडचणी निर्माण झाल्‍या होत्‍या परंतु मा.खा.डॉ.श्री.सुजय विखे यांनी मार्ग काढीत हा प्रकल्‍प राबविला त्‍यामुळे 60 कुटुंबाला स्‍वत:चे हक्‍काचे घर मिळाले पुढील काळात 15 कुटुंबानाही याच ठिकाणी घर मिळणार आहे सनफार्मा व क्राम्‍प्‍टन कंपनीने या ठिकाणी विविध कामासाठी निधी उपलब्‍ध करून दिला आहे. या ठिकाणी डांबरीकरणाचे रस्‍ते झाले. याचबरोबर पर्यावरणासाठी मोठया प्रमाणात वृक्षारोपन करण्‍यात आले. सौर पथदिवे बसविण्‍यात आले. गावच्‍या विकासासाठी आम्‍ही खा.डॉ.श्री.सुजय विखे पा. यांच्‍या कडून निधी उपलब्‍ध करून घेवू. ही योजना पूर्ण करण्‍यासाठी विविध स्‍वच्‍छ भारत अभियान, नरेगा शौचोलय, शबरी आवास योजनेचा निधी उपलब्‍ध झाला असल्‍यामुळे हा प्रकल्‍प यशस्‍वी रित्‍या राबविण्‍यात आला असल्‍याचे ते म्‍हणाले.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only