Saturday, May 29, 2021

काळे फक्त स्टंटमन, त्यांना मानसोपचाराची गरज- राष्ट्रवादीचे खोसे, बांगरे व बनसोडे यांचा आरोपनगर दिनांक 29 प्रतिनिधी 


काँग्रेसच्या स्टंटमॅन किरण काळे यांनी पुन्हा एकदा नवीन स्टंट केला आहे व काळे मोठ्या लोकांवर आरोप करत असतात, त्यांच्या वरिष्ठांना खूश करण्यासाठी असे ते वारंवार प्रकार करतात असा  आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित खोसे,सुरेश बनसोडे,निलेश बांगरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. काळे यांनी मानसोपचार सल्ला व उपचार घ्यावेत, असा सल्ला त्यांनी दिला.काल दिनांक २८ मे, २०२५ रोजी महानगरपालिकेच्या जुन्या मनपा कार्यालयातील आरोग्य अधिकान्याच्या दालनामध्ये आ. संग्राम 

जगताप लसीकरण नियोजन जाणून घेण्यासाठी गेले होते. तेथे काळे यांचा स्टंट पाहिला. त्यांचा स्टेट हा नगरकरासाठी काही नवीन नाही. पण या माध्यमातून त्याच्या पक्षश्रेष्ठींना किरण काळे हे काय दाखवण्याचा त्याचा प्रयत्न करतात, हे समजून येत नाही.असे ते म्हणाले, काही जण ब्लॅकमेल करणारे तेथे होते,ते महापालिका मधील फाईल पळवून नेतात,असा आरोप खोसे, बनसोडे व बांगरे यांनी कोणाचेही नाव न घेता या वेळी केला. 

सुवेंद्र गांधी यांनी एक व्हिडीओ काल टाकला ,त्यात काही तथ्य नाही,महापालिका मध्ये लस कोणाला कशी मिळतात हे माहीत आहे. तेथे आवक- जावक नोंद असते. हे काय अर्बन बँक नाही,की बापाची सही पोरगा करतो व पैसे काढतो, असे पालिकेत नाही, असा सूचक टोला त्यांनी लगावला .


नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांचा व आमदारांचा कोणताही वाद झाला नाही, ते खोटे बोलत आहे,बोराटे यांच्या वर हल्ला झाला असे ते म्हणाले तर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पाहिजे. तेथे मनपा आरोग्य अधीकारी बोरगे होते, त्यामुळे बोराटेना साक्षीदारही मिळेल, असे ते म्हणाले.


काल स्वतः आमदार  संग्राम जगताप हे दुपारी २ वाजता शहरातील लसीकरणा बाबत आरोग्य अधिकारी  बोरगे यांच्याकडून माहिती घेत होते, तसेच उपाययोजना करण्याबाबत व सर्व लसीकरण केद्रना लसींचे समान वाटप करण्याचे सूचित करत असताना किरण काळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आरडाओरड करू लागले. त्यावेळी पोलीस प्रशासनाच्या अधिका-यांनी त्यांना याबाबत मज्जाव करून त्यांना हाताला धरून दालनाबाहेर काढले व स्टंट करण्यापासून रोखले. पण किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेवून नेहमीप्रमाणे पत्रकार व नगरकरांची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.


तसेच त्यांची मानसिक वृत्ती राजकारणामध्ये स्टंट करून मोठे व्हायचे असल्याचे दिसून येते. पण राजकारणात नागरिकांची सेवा करून मोठे होता येते, तेव्हाच नागरिक लोकप्रतिनिधी म्हणून स्विकारतात. कदाचित ही बाब त्यांना माहिती नसावी. काल आमदार व आरोग्य अधिकारी यांची बैठक सुरु असताना अनाधिकृतपणे दालनात प्रवेश करून कॉंग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा शहराध्यक्ष असून साधा प्रोटोकॉल माहित नाही का ? म्हणजेच त्यांचा स्टंट करण्याचा हेतू यातून स्पष्ट होतो. तसेच याबाबत मनपामध्ये बैठक सुरू असल्याचे काही ब्लॅकमेलर लोक जे त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांनी किरण काळेना बोलवून घेतले.. किरण काळेची मानसिक वृत्ती व राजकीय स्टंट पाहता त्यांना मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याची गरज आहे. कारण राजकारणात संयम, विचार व लोकसेवे ने प्रश्न मार्गी लागतात. त्यामुळे किरण काळेच्या अशा विचित्र वागण्याला नगरकर भिक घालणार नाहीत.असे ते म्हणाले.


चौकट

पाठपुरावा करणार


महात्मा फुले जन आरोग्य केंद्रामध्ये एका महिला आरोग्य कर्मचारीला दमदाटी झाली त्याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालेली आहे. संबंधित महिला आजारी असल्यामुळे तिला डिस्चार्ज दिल्यानंतर हा गुन्हा दाखल होईल असे बोरगे यांनी आम्हाला सांगितले आहे त्यासंदर्भात सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आह. तसेच तेथे एक 15 वर्षाच्या मुलास लस दिली गेली आहे, त्याच्याही चौकशीची मागणी केली आहे. त्यातील दोषींवर कारवाई झाली नाही तर आम्ही आंदोलन करणार आहे, असे खोसे, बांगरे व बनसोडे यांनी सांगितले.


चौकट


मनपात लस नोंद


महापालिका मधील लस कोणाला कशी द्यायची याचे नियोजन केले जाते व त्या प्रमाणे वितरण केली जाते जर एखाद्याने लस नेली असेल तर महापालिकेने तक्रार दिली असती पण तसे काही झालेले नाही, पण  जर आडे काही झाले असेल तर संबंधितांवर कारवाई पण झाली पाहिजे असे ते म्हणालेPost a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only