Wednesday, May 5, 2021

जिल्हा रुग्णालयांमध्ये आता कुणालाही प्रवेश नाही

 नगर दि 5 प्रतिनिधी 


जिल्हा रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचा विषय सध्या चांगलाच गाजत आहे. मात्र, यामुळे रुग्ण सेवा करताना अडचणी निर्माण होत असल्याने आता जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या व्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला प्रवेश दिला जाणार नाही अशा प्रकारचे आदेश दिले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.


जिल्हा रुग्णालयांमध्ये सध्या covid-19 संदभात 500वर रुग्णावर उपचार सुरू आहेत, त्याठिकाणी नातेवाईक तसेच इतर व्यक्तींच्या गर्दीचा विषय चांगलाच गाजत आहे. नातेवाईकांनी रुग्णासाठी डबे आणणे, जवळपास कोणी वैद्यकीय कर्मचारी नसेल तर स्वतःच रुग्णाचा ऑक्सिजन वाढवणे व अन्य प्रकार होत आहेत. तेथील रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना त्यामुळे रुग्णसेवा देताना अडथळा निर्माण होत आहे, अशा प्रकारची अडचण जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुनील पोखरणा यांनी मांडली होती. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी तात्काळ या ठिकाणी रुग्णांच्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेश देऊ नका अशा प्रकारचे निर्देश दिले होते व त्याची अंमलबजावणी पोलीस विभागाला करण्यास सांगितली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आता त्याबाबतचे आदेश दिलेले आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज जिल्हा रुग्णालयात भेट देऊन तेथील परिस्थितीची  पाहणी केली. रुग्णालयाच्या आवारातील सर्व खासगी वाहने बाहेर काढून रस्त्याच्या कडेला लावण्यात आली, तसेच आवारातील नातेवाईक व अन्य अवांतर गर्दीलाही हटवण्यात आले.


एकच दरवाजा सुरू राहणार

 जिल्हा रुग्णालयातील मुख्य प्रवेशद्वार एवढे आता चालू राहील. इतर सर्व दारे बंद करण्यात आलेली आहे, तसेच जिल्हा रुग्णालयांमध्ये आता कोणत्याही नातेवाइकांना प्रवेश मिळणार नाही असेही या आदेशांमध्ये म्हटलेले आहे,  डॉक्टर यांच्यासह जे कुणी कर्मचारी आहेत, त्यांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ही या रुग्णालयाबाहेर करण्यात आलेली आहे. रुग्ण स्वतः किंवा रुग्ण घेऊन आलेली अम्ब्युलन्स अथवा जे दिव्यांग व्यक्ती उपचाराला येतात, त्यांची वाहने आतमध्ये सोडण्यामध्ये परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र इतर कोणत्याही वाहनांना आत मध्ये परवानगी देण्यात आलेली नाही, नातेवाईकांबरोबर लोकप्रतिनिधी असो अथवा अन्य प्रशासकीय अधिकारी असो कर्मचारी असो यांना आत मध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असेही दिलेल्या देशांमध्ये म्हटलेले आहे.


मुख्य गेटवर स्वतंत्र पोलीस अधिकारी व पाच कर्मचारी नेमण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तसेच रुग्णालयात मध्ये दोन पोलिस नियुक्त केले जाणार आहे. ज्या ठिकाणी शवविच्छेदन किंवा शव ठेवले होते त्या ठिकाणी सुद्धा पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. 24 तास जिल्हा रुग्णालयाला पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे आदेशामध्ये म्हटले आहे.  ज्या रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन व्यवस्था करायची आहे अशा स्वयंसेवी संस्थांनी परिसरातील शाळा-कॉलेजच्या असलेल्या मैदानामध्ये  उपलब्ध करून दिले तर त्या ठिकाणी त्यांना ते मिळू शकतील अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा करण्यात यावी अशा प्रकारचे निर्देश सुद्धा अधीक्षक पाटील यांनी दिलेले आहे.


चौकट


लसीकरण साठी स्वतंत्र प्रवेश


जिल्हा रुग्णालयामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी कोविड लसीकरण करण्यात येते त्याची जागा बदलली जाणार असून  ते रुग्णालयाच्या दुसऱ्या बाजूला नेण्याचे व तेथेच त्यांच्या येण्या-जाण्याचा दरवाजा करण्यासंदर्भातले आदेश सुद्धा दिली असून त्याची अंमलबजावणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी करावी, असे दिलेल्या आदेशांमध्ये म्हटले आहे.

Post a Comment

Whatsapp Button works on Mobile Device only